latur sakal
मराठवाडा

Latur News : लातूर जिल्ह्यात अनेक शाळांना कुलूप ; जिल्हा परिषदेचे शिक्षक सर्वेक्षणावर गेल्याने विद्यार्थी वाऱ्यावर

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. याकरिता जिल्हा परिषदेच्या सर्वच शिक्षकांना कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना कुलूप लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. याकरिता जिल्हा परिषदेच्या सर्वच शिक्षकांना कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना कुलूप लागले आहे. तर काही शाळात एखादा दुसरा शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना खेळाचीच सुटी देण्य़ात आली आहे. शिक्षक सर्वेक्षणावर गेल्याने विद्यार्थी वाऱ्यावर अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. पुढील दहा दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याकडे गांभीर्याने पहायला प्रशासनाला वेळच नसल्याचे चित्र आहे.

दबावाखाली शिक्षण विभाग

महसूल विभागाच्या दबावाखाली येत शाळांचे काय होणार याचा विचार न करता तातडीने शिक्षण विभागाने या सर्वेक्षणाच्या कामासाठी शिक्षक देऊन टाकले. सर्वेक्षणाचे आदेश दिले; पण शाळा कशा सुरू ठेवायच्या याचा मात्र उल्लेख केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार न करता शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर गेले आहेत. आधीच शिक्षकांच्या खांद्यावर अध्यापनाचे काम सोडून इतर अनेक कामांचे ओझे आहे. त्यात हे सर्वेक्षण आल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना कुलूप लागले आहे.

शिक्षकाची नगण्य उपस्थिती

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना कुलूप लागले असले तरी काही शाळेत मात्र एखादा दुसरा शिक्षक ठेवण्यात आला आहे. ते नावालाच उपस्थितीत आहेत. वेगवेगळ्या वर्गाचे ते अध्यापन कसे घेणार हा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या तरी अशा शाळेत मुले खेळाच्या तासाचाच अनुभव घेताना दिसत आहेत. अध्यापन सोडून इतर कामे लावले जात असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी सुधार होणार हा खरा प्रश्न आहे.

दहावीच्या सराव परीक्षाही वाऱ्यावर

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५० माध्यमिक शाळा आहेत. यात दहावीचे अनेक विद्यार्थी आहेत. दहावीची परीक्षा काही दिवसांवर आली आहे. सध्या सराव परीक्षा घेण्याचे दिवस आहेत. असे असताना देखील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धांवर देखील पाणी सोडण्यात आले आहे.

मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. योग्य नियोजन न लावल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. किमान ५० टक्के शिक्षक शाळावर ठेवण्याची गरज आहे.

—अप्पाराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,

लातूर.

मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे सर्वेक्षण वेळेत करावयाचे आहे; पण एखादा शिक्षक शाळेवर ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

—संजय पंचगल्ले, गटशिक्षणाधिकारी, लातूर.

शिक्षकांच्या खांद्यावर कामांचे ओझं

  • मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण तातडीने करा

  • माझी शाळा सुंदर शाळाची शंभर टक्के नोंदणी करा

  • आधार नोंदणी शंभर टक्के पूर्ण करा

  • शिष्यवृत्ती अॅप डाऊनलोड करुन पालकाना कळवा

  • नवभारत साक्षरता सर्वेक्षण तातडीने करा

  • यु डायस ऑनलाईन माहिती दररोज भरा

  • शालेय पोषण आहाराची माहिती दररोज ऑनलाईन भरा

  • विद्यार्थी पोर्टल असलेल्या सरलवर ऑनलाईन माहिती दररोज भरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT