Collector Dr.Vipin_.JPG 
मराठवाडा

अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाउन कायम

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील आरोग्य, कृषी यासह अत्यावश्यक सेवांसह ग्रामिण भागातील काही उद्योग सुरु करण्यासाठी काही अटीवर सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परंतु सध्या लॉगडाउनचे सर्व निर्बंध लागु असल्यामुळे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

पत्रकारांशी साधला संवाद
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके आदी उपस्थित होते.

ता. वीस एप्रीलपासुन काही उद्योग सुरु 
डॉ. विपीन यांनी सांगीतले, की जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्न आढळला नाही. यामुळे शासनाने ता. २० एप्रीलपासुन काही अत्यावश्यक सेवा, सुरु करण्यासाठी सशर्त परवागणी दिली आहे. या जनतेला कळाल्या पाहिजे. काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेला लॉकडाउन सध्या सुरु आहे. यात संचारबंदी असल्यामुळे रेल्वे, विमान, बस, ॲटो, टक्सी या प्रवाशी यंत्रणासह शाळा, शिकवणी, प्रशिक्षण केंद्र बंद राहणार आहेत. या सोबतच जिल्हा तसेच राज्याच्या सिमाही पुर्वी प्रमाणेच बंद राहतील. अत्यावश्यक सेवामध्ये आरोग्य विषयक सर्वच बाबी सुरु राहणार आहेत. पूर्वी प्रमाणेच जिवणावश्यक वस्तुचा पुरवठा करणारे दुकाने चालू राहतील. बॅंका, कृषी व कृषी संलग्न सेवा तसेच ग्रामिण भागातील लघू उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे. या उद्योगांसाठी कामगारांची वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. कामगारांना उद्योगाच्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय करावी लागेल, असे ते म्हणाले.

तहसीलदारांना पास देण्याचे अधिकार
सध्या सर्व तालुक्याचे तहसिलदार तथा ईन्सीडेंट कमांडन्ट् म्हणुन नियुक्त केल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये होणाऱ्या अत्यावश्याक हालचाली करीता पासेस वितरण करतील. जसे सूट दिलेली कार्यालये, कामाच्या ठिकाणे, कारखाने व आस्थापनांमधील कर्मचारी आदी सर्व पासच्या प्रती स्थानिक पोलिसांना अग्रेषित करावे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक स्थळी तसेच कामाचे ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात यावा. 

वीस पेक्षा अधीक लोकांना परवागणी नाही
लग्न तसेच अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वीस पेक्षा अधीक लोकांन एकत्र येणार नाही. बांधकाम मजूरांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करावी, अशा सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावे. शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची दहा टक्के उपस्थिती राहणार आहे. अत्यावश्यक सेवांच्या चारचाकी वाहनात दोन व्यक्ती, दुचाकीवर एक व्यक्ती तर मालवाहू ट्रकमध्ये दोन किंवा तीन व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील बेकरी, फरसानची दुकाने सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत चालु राहतील. हॉटेलमधून तयार जेवन पार्सल मागविता येइल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगीतले. इतर राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील लोकांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात नाही. नांदेड गुरुव्दारात अडकलेल्या इतर राज्यातील यात्रेकरुंना गृहमंत्रालयाची परवानगी आल्याशिवाय त्यांना त्यांच्या राज्यात पाठवता येणार नाही, असे त्यांनी सांगीतले.

कोरोनाचा रुग्न निघू शकतो
जिल्ह्यातील आजपर्यंत ३७३ लोकांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३६८ नमुने निगेटीव्ह तर पाच नमुने फेटाळले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्न आढळून आला नाही. परंतु एखादा लपून असलेला रुग्ण निघू शकतो. यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. 

दोन तपासणी प्रयोगशाळा
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेची तयारी पूर्ण झाली आहे. येथील पायाभूत सुविधा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात येथे कोरोनाची तपासणी सुरु होइल. तसेच शासकीय रुग्णालयातही दुसरी तपासणी प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. या दोन्ही प्रयोगशाळा जिल्ह्यातील रुग्नांच्या लाळेची तपासणी होइल. तसेच इतर आजाराच्या तपासण्याही यात होणार आहेत.  

ग्रीनझोनच्या नावाखाली बाहेर पडणे धोक्याचे 
नांदेड जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नसल्याने शासनाने काही झोन निर्धारीत केले आहेत. यात नांदेड ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे आपल्याला काही होणार नाही, या गैरसमजात विनाकारण घराबाहेर पडणे धोकादायक असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगीतले. अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांनी घराबाहेर पडू नये. गर्दीची ठिकाण अद्याप खुली केले नाहीत. संचारबंदी चालू असल्याने सामाजीक अंतर राखुन व्यवहार करावा.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT