hingoli photo 
मराठवाडा

लॉकडाउनने सलून चालकाला बनविले मिरची विक्रेता

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली): लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्यामुळे व्यावसायिक व कामगार अडचणीत सापडले आहेत. यामधून मार्ग काढीत एका सलून कामगाराने पारंपारिक व्यवसाय बंद असताना थेट शेतकऱ्यांकडून लाल मिरची खरेदी करत शहरात एक दिवसआड भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये विक्री करीत रोजगार शोधला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश व्यवसाय ठप्प झाले असून रोजगार, मजुरांच्या हाताला काम राहिले नाही. त्यामुळे बंदचा फटका सर्वच व्यवसाय कामगार व मजुरांनाही बसला आहे. 

सलून व्यवसाय पूर्णतः बंद

मात्र, यामधूनही अनेकांनी मार्ग शोधत रोजगाराच्या संधी निर्माण करीत आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मागील दीड महिन्यापासून शहर व परिसरातील सलून व्यवसाय पूर्णतः बंद आहेत. हा व्यवसाय बंद पडल्यानंतर व्यवसायिक व कामगार अडचणीत सापडले आहेत. 

आजाराच्या भीतीने  व्यवसाय बंद

यामधूनही काही व्यवसायिकांनी चोरीछुपे पद्धतीने शेतात व इतरत्र व्यवसाय करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, कटिंग, दाढी करताना ग्राहक व सलून कामगारांचा येणारा जवळचा संबंध पाहता अनेक व्यावसायिक व कामगारांनी आजाराच्या भीतीने आपल्या व्यवसायापासून दूर राहणे पसंत केले आहे. 

भाजी मार्केटमध्ये मिरच्यांची विक्री

या परिस्थितीत शहरात एका सलून दुकानावर कामगार असणाऱ्या बालाजी सोनटक्के या युवकाने सलून व्यवसाय बंद झाल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता पर्याय शोधला आहे.
जांभरून व मोरवड येथील शेतकऱ्यांकडून लाल मिरची खरेदी करत शहरात एक दिवसआड भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये विक्री करण्याचा निर्णय घेतला. 

पैसे देण्याची सवलत

या निर्णयाला दोन्ही गावच्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत मिरचीची विक्री झाल्यानंतर पैसे देण्याची सवलत दिली. एका वेळेस ५० किलो मिरची ठोक भावाने खरेदी करीत बालाजी सोनटक्के याने आपल्या मोटरसायकलवरून मिरची वाहतूक करीत विक्री सुरू केली. 

कुटुंबाचा उदरनिर्वाह 

यातून श्री. सोनटक्के यास खरेदी केलेल्या भावापेक्षा ४०० ते ५०० रुपये शिल्लक राहू लागले आहेत. मिरची विकून जमा झालेले पैसे शेतकऱ्याला देत उरलेल्या इतर पैशांमधून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला आहे.

कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे नवीन व्यवसाय थाटायचा म्हटले तरी लॉकडाउनमुळे शक्य नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय अनेकांनी निवडला आहे. यातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास मदत झाली असून या व्यवसायातून रोजगारही उपलब्ध झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT