file photo 
मराठवाडा

‘लॉकडाऊन’ ने गव्हाची चढ्या दराने विक्री !

कैलास चव्हाण

परभणी : कोरोनामुळे सर्वत्र ‘लॉकडाऊन’ झाल्यानंतर जिवनावश्यक वस्तुंचे भाव वाढवण्यास विक्रेत्यांकडून सुरुवात झाली आहे. गहु, ज्वारीच्या किंमती विक्रेत्यांनी वाढवल्याने सर्वसामान्यांना त्याची झळ बसु लागली आहे.


‘कोरोना’मुळे ता.२१ पासून लॉकडाऊन सुरु आहे. ता.२१ रोजी बाजारपेठ बंद होती. त्यानंतर रविवारी जनता कर्फ्यु लागला. सोमवारी (ता.२३) जमावबंदी लावण्यात आल्यानंतर लोक बाहेर दिसु लागल्याने मंगळवारी कर्फ्यु लावल्यानंतर त्याच रात्री पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सर्वत्र बंद आहे. केवळ जीवनावश्यक वस्तु वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये किराणा दुकाने, भाजीपाला, दुध, मेडीकल सुरु आहेत. बंद दरम्यान, अनेकांना आपले हात धुऊन घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. अनेक संधीसाधुनी आपल्या जवळील मालाच्या किंमती भरमसाठ वाढ करण्यास सुरवात केली आहे. गहु, ज्वारी या जिवनावश्यक धान्याच्या किंमती वाढवल्याच्या तक्रारी लोक करु लागले आहेत. 


खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प 
घ्यायचे तर घ्या अन्यथा जा असे दुकानदार सांगु लागल्याने जनता अवाक झाली आहे. सध्या परभणी जिल्ह्यात गहु, ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. नव्या गव्हाची आणि ज्वारीची अवक सुरु झाली होती. मात्र, कोरोनामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तर दुसरीकडे अफवा पसरल्यामुळे आणि शेतमाल शहरात येत नसल्याने स्थानीक दुकानदारांनी काही मालाचे भाव वाढवले आहेत. जो गहु आठ दिवसापूर्वी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपये क्विंटल होता. त्याच्या किंमती थेट २ हजार ७०० ते ८०० रुपयावर गेल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून किती लुटमार होत आहे हे दिसुन येत आहे.

 ग्रामीण भागात भाव स्थिर
ग्रामीण भागात नव्या गव्हाची अवक सुरु झाली आहे. त्यामुळे भावही स्थिर आहेत. सध्या नवा गहु एक हजार ८०० ते २ हजार रुपये असे दर आहेत. तर जुन्या गव्हाचे २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपये असे दर आहेत. त्यामुळे शहरी भागात व्यापाऱ्यांची लुटमार सुरु असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - कापूस-तूर खरेदीला फटका !


होलसेल व्यापाऱ्यांकडून लूट
गहु, हरबरा, तुर डाळीच्या किंमती या होलसेल विक्रेत्यांनी वाढवल्याची माहीती एका रिटेल दुकानदारांने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. गव्हाच्या किंमती थेट पाचशे रुपयांनी वाढवल्या आहेत. तर अन्य किराणा साहित्यादेखील किलोमागे १० ते २० रुपयांची वाढ केल्या असल्याचे समोर आले आहे.



पथके तयार करणार....
परभणी शहरात खासगी धान्य विक्रेत्यांनी चढ्या दराने धान्य विक्री करु यासाठी महसुल विभाग पथके तयार करत आहे. या पथकाद्वारे शहरातील विविध दुकानावर तपासणी करुन धान्याच्या किंमती, साठे तपासण्यात येणार आहेत.
- विद्याचरण कडवकर,तहसिलदार परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

अख्खं कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने चांदीनगरी हळहळली; शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT