जालना : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिककडून चार हजार ४४९ बॅलेट युनिट, दोन हजार ५४९ कंट्रोल युनिट आणि दोन हजार ६७४ व्हीव्हीपॅट मशिन प्राप्त झाल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व मशिनची प्रथम स्तरीय तपासणी ता. चार जुलैपासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरू झाली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
जिल्ह्यास प्राप्त झालेल्या प्रत्येक बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीनची पूर्व प्रथम स्तरीय तपासणी स्वतंत्ररीत्या तांत्रिक पद्धतीने निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ अभियंत्यांकडून केली जात आहे. यात ज्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे, अशा मशिन बाजूला काढून त्या परत भारत निवडणूक आयोगाकडे पाठवल्या जाणार आहेत.
पूर्व प्रथमस्तरीय तपासणी झाल्यानंतर प्रत्येक सीयु, बीयु व व्हीव्हीपॅट मशीनची एकमेकांशी जोडणी करून डमी बॅलेट पेपरवर प्रत्येक उमेदवारास सहा असे एकूण ९६ मतदान केले जाते. त्यासोबत व्हीव्हीपॅट मशीनमधून बाहेर पडणाऱ्या स्लिपची तपासणी केली जाते. त्यानंतर सर्व मशीनची प्रथमस्तरीय तपासणी झाल्यानंतर यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडलेल्या पाच टक्के मशीनवर मॉकपोल ही प्रक्रिया राबविण्यात
येईल. यात एक टक्के मशीनवर एक हजार २००, दोन टक्के मशीनवर एक हजार व नंतरच्या दोन टक्के मशीनवर पाचशे मतदान केले जाणार आहे.
ही प्रक्रिया आयोगाकडून प्राप्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करून केले जात आहे. या सर्व प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरचे ईव्हीएम नोडल अधिकारी यांची ता. १३ व ता. १४ जुलै रोजी दोन दिवशी तपासणीसाठी नियुक्ती केली आहे.
सध्या भारत निवडणूक आयोगाचे रवीरंजन कुमार, अमित कुमार, शैलेंद्र पाल, एच. एस. अप्रिता, काव्या पाटील, सुभाषचंद्र त्यागी, मदनपाल सिंग, अमरजीत कुमार, रिषी रोषन या नऊ तज्ज्ञ अभियंत्यांकडून प्रथमस्तरीय तपासणी मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तय्यब देशमुख, नायब तहसीलदार दिलीप सोनवणे, मुकुंद उन्हाळे,
महसूल सहायक संजय खांडेभराड, शरद अडणे, निखिल कडू, सुरेश खनपटे, लक्ष्मण गायकवाड, डाटा एंट्री ऑपरेटर पप्पू हुंडीवाले, प्रमोद कांबळे, रंजीत गायकवाड, अमोल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सी. आर. ठाकूर, पोलिस कर्मचारी नजीर पटेल, सचिन कवलिंगे, कृष्णा गरदास, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे ए. एस. झवेरी, व्ही. के. बोंदर यांच्या समक्ष तपासणी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.