Lok Sabha Election Sakal
मराठवाडा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

नवनाथ इधाटे

फुलंब्री : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या तोफा शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता थंडावल्या. आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाची घालमेल करणाऱ्या उमेदवारांना आराम मिळाला आहे.

मात्र  उमेदवार, पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासाठी उद्याचा दिवस ‘रात्र-वैऱ्या’ची या धर्तीवर असणार आहे.  सत्ताधारी व विरोधकांनी आरोप प्रत्यारोपाची एकही संधी सोडली नाही. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात जालना विधानसभा मतदारसंघात येत असल्याने फुलंब्री मतदारसंघात एन उन्हामध्ये सत्ताधारी व विरोधकांनी गावोगाव आणि घरोघर फिरून प्रचार केला आहे.

घराघरांमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी आपापल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपापल्या उमेदवाराचा प्रचार केला आहे. त्यामुळे कडक उन्हात प्रचार करताना उमेदवारासह कार्यकर्त्यांची दमछाक झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये महायुतीकडून रावसाहेब दानवे तर महाविकास आघाडीतून डॉ. कल्याण काळे निवडणूक रिंगणात उभे आहे.

तर तिसरा पर्याय म्हणून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मंगेश साबळे जालना लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच लढत आहे. या तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या प्रचार सभा व रॅलीत मतदारांचा मोठा सक्रिय सहभाग दिसून आला. त्यामुळे यावेळेस होणाऱ्या मतदानात अमलाग्र बदल हे मतदार करणार असल्याचे चर्चा सुरू आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आहे सर्वच प्रमुख उमेदवारांच्या प्रचार सभा पार पडल्या. या प्रचार सभेमध्ये राज्यातील प्रमुख नेत्यांनी सहभाग घेऊन आपापल्या उमेदवाराचा प्रचार केला. १३ मे रोजी मतदान होणार असून मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT