आडुळ - गेल्या अनेक दिवसांपासुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ऑनलाईन सर्वर मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आडुळसह परिसरातील जवळपास पन्नास गावातील महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या खाते धारकांची तारांबळ उडाली आहे. स्वत:चे पैसे असुन देखील बँकेत खेट्या माराव्या लागत असल्याने येथील खाते धारक संताप व्यक्त करीत आहेत.
गेल्या चार पाच दिवसांपासुन आडुळ (ता. पैठण) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खाते धारकांचे ऑनलाईन फोन पे, गुगल पे, आरटीजीएस व नेट बँकिंग व्दारे ट्रांजेक्शन होत नसल्याने बँकेत पैसे असुन देखील वेळ प्रसंगी पैसे काढता येत नसल्याने येथील अनेक व्यापारी, शेतकरी व महिला अडचणीत सापडल्या आहेत. या संदर्भात येथील शाखा व्यवस्थापक यांना संपर्क करण्याचा पर्यंत केला असता त्यांनी कॉल तर घेतलाच नाही पण नंतर सकाळ बातमीदार यांचा नंबरच ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला.
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जास्तीचे खातेदार असल्याने येथे नेहमीच गर्दी असते त्यामुळे आडुळ सह परिसरातील अनेक नागरीकांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा पर्याय निवडुन बँकेत खाते उघडले माञ या बँकेत ही नागरीकांना तुच्छ दर्ज्याची वागणुक दिली जात असल्याचे अनेक खातेदारांच्या तक्रारी आहेत. शिवाय येथील शाखा व्यवस्थापक यांना नागरीकांनी काही कामानिमित्त कॉल केला तर सदरील शाखाव्यवस्थापक संबधितांना तुम्हाला कोणी नंबर दिला मला कॉल का केला हा माझा पर्सन नंबर आहे ऑफिसला येवुन भेटा असे प्रती प्रश्न करुन ग्राहकांनाच जेरीस धरले जात आहे.
सध्या बँकेचे सर्वर व्यवस्थित चालत नसल्याने अनेक ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतकरयांना मशागत, खते व औषधीसाठी बँकेतील पैसे काढण्यासाठी खेट्या मारित आहे तर हिच स्थिती येथील व्यापारी, विधावा, वृध्दांसह नागरीक येथील कर्मचारयांच्या आडमुठ्या धोरणामुळे वैतागले आहेत.
त्यामुळे येथील शाखा व्यवस्थापक यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष शुभम पिवळ, शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष ज्योती पठाडे, उपसरपंच जाहेर शेख, ग्राम पंचायत सदस्य नारायण पिवळ, भाऊसाहेब पिवळ, माजी सरपंच भाऊसाहेब कोल्हे, माजी सरपंच अशोक भावले, उपसरपंच भास्कर गिते, सरपंच विनोद राठोड, माजी पंचायत समिती सदस्य कल्याण राठोड, माजी सरपंच आंबादास कोरडे, सरपंच नवनाथ सांगळे, उपसरपंच अजमोद्दिन शेख, सरपंच प्रतिक्षा आगलावे, सरपंच तुळशीराम बताडे, दत्तुनाना ठोंबरे, चेअरमन शितल कासलीवाल, सरपंच शेखअली शेख, उपसरपंच अनिल मोरे, शिवलाल राठोड यांच्यासह परिसरातील नागरीकांनी केली आहे.
'NPCI/RBI द्वारे जारी करण्यात आलेल्या सायबर सुरक्षा सूचनांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून UPI, IMPS, NEFT, RTGS इत्यादी डिजिटल पेमेंट सुविधा थांबवण्यात आल्या आहेत , परंतु शाखेत रोख रक्कम स्वीकारणे /काढणे ,चेक ,DD,इ. द्वारे व्यवहार सुरु आहेत. NPCI ने मंजुरी दिल्यानंतर डिजिटल पेमेंट सुविधा पुन्हा सुरु होतील.'
- श्री.वाडेकर, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक, छ.संभाजीनगर
'माझ्याकडे कँटर असुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे फोन पे आहे सर्वर डाऊन झाल्याने माझाचा फासटॅग सह इतर कोणतचे ऑनलाईन पेमेंट होत नसुन या संदर्भात बँकेत विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.'
- मुस्तकिम शेख (खातेधारक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.