z p school  sakal
मराठवाडा

Parbhani : शालेय व्यवस्थापन समितीत पतीच कारभारी

गंगाखेडमधील धारखेड शालेय व्यवस्थापन समितीत महिलाराज

प्रा.डॉ. अंकुश वाघमारे

गंगाखेड : महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेचा कारभार सुरळीत चालावा. शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात. शिक्षकांच्या अध्यापनास उत्तम दर्जा प्राप्त व्हावा. विद्यार्थ्यांची पटसंख्या पूर्ण क्षमतेने असावी. हा उदात्य हेतू समोर ठेवून शालेय व्यवस्थापन समितीचे गठण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यानुसार पालक सभेत शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सदस्यांची निवड केली जाते. परंतु, गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शालेय व्यवस्थापन समितीत पतीच कारभारी असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोतून दिसून येते.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये १२ ते १६ सदस्य असले पाहिजेत. या सदस्यांपैकी ७५ टक्के सदस्य हे विद्यार्थ्यांचे आई-वडील असावेत. यामध्येच दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येत असते. उर्वरित २५ टक्के सदस्य हे निवडून आलेले सदस्य, शिक्षकांमधून निवडलेले सदस्य, पालकांनी पालक सभेत निवडलेले शिक्षण तज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञ असे असतात.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड ही पालकांचे आई-वडील करतात तर मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असतात. या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पन्नास टक्के महिलांचा समावेश असावा अशी नियमावली आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन आवश्यक असते.

शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, बालक शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेणे, शाळेत भौतिक सुविधा खरेदी करताना देखरेख ठेवणे, महिन्यातून एकदा पालक सभा घेणे, शिक्षकांच्या अध्यापनावर लक्ष ठेवणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची निवारण करणे असे कामे असतात.

गंगाखेड तालुक्यातील १४५ जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी १२३ जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये ९२ ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती बिनविरोध करण्यात आली तर तालुक्यातील धारखेड येथील शालेय व्यवस्थापन समितीत महिलाराज आहे.

अनेक ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीमध्ये महिलांची निवड झालेली असतानादेखील सत्काराच्या वेळी पतीनेच हार घालून पतीच कारभारी असल्याचे गावकऱ्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न तालुक्यातील सुजाण नागरिकांना पडला आहे.

शालेय व्यवस्थापन समितीत ज्या महिलांची निवड झाली आहे. त्या महिलाच कारभार पाहतील. त्यांच्या पतीने जर कारभार पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणच्या शालेय समितीची निवड प्रक्रिया रद्द करण्यात येईल.

- बालाजी सगट,गटशिक्षणाधिकारी, गंगाखेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT