beed beed
मराठवाडा

माजलगावात रस्त्यांची बिकट अवस्था; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तालखेड जवळूनच राष्ट्रीय महामार्ग गेलेला असला तरी त्या राष्ट्रीय महामार्गापासून गावात येण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागते

सकाळ वृत्तसेवा

तालखेड जवळूनच राष्ट्रीय महामार्ग गेलेला असला तरी त्या राष्ट्रीय महामार्गापासून गावात येण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागते

माजलगाव (बीड): माजलगाव तालुक्यातील तालखेड, खेर्डा, एकदरा, तेलगाव, पुंगणी, डूबा, इर्ला या गावांना जाण्यासाठी पक्का रस्ता अद्यापही बांधण्यात आलेला नाही. परिणामी ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गावकऱ्यांना दररोज मरण यातना भोगाव्या लागत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील गेवराई आणि माजलगाव तालुक्याच्या सीमेवर असणारी तालखेड, तेलगाव, पुंगणी, एकदरा, खेर्डा, इर्ला, डूबा या गावांचा काही वर्षांपूर्वी गेवराई मतदार संघांत समावेश झाला. त्यामुळे माजलगाव बरोबरच आता गेवराई प्रशासनही गावांच्या विकासासाठी मदत करेल अशी अपेक्षा या भागातील लोकांना होती. मात्र झाले उलटेच. कोणीही याकडे लक्ष दिले नाही. या दोन्ही प्रशासकीय यंत्रणेच्या कचाट्यात ही गावे सापडली असून विकासाची वाट शोधत आहेत. या गावांकडे जाण्यासाठी रस्ताही चांगला तयार करण्यात आलेला नाही.

तालखेड जवळूनच राष्ट्रीय महामार्ग गेलेला असला तरी त्या राष्ट्रीय महामार्गापासून गावात येण्यासाठी गावकऱ्यांना कसरत करावी लागते. जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढत ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. हा जीवघेणा प्रवास करीत असताना अनेक अपघात होतात. या अपघातांत अनेक जखमी झाले आहेत. वेळोवेळी या भागातील नागरिकांनी पुढाऱ्यांना विनवण्या केल्या मात्र केवळ आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. निवडणूक आली की रस्ता करण्याचे गाजर दाखवले जाते. मात्र निवडणूक झाल्यानंतर कोणीही लक्ष देत नाही. प्रशासनाने याची दखल घेत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT