Accident News Esakal
मराठवाडा

Accident News: बीड-परळी महामार्गावर कंटनरने रिक्षाला उडवलं; भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली

अंकिता खाणे (Ankita Khane)

बीड जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ काल (रविवारी) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. नसरीन अजीम शेख (वय वर्षे 35), नोमान अजीम शेख (वय वर्षे 13) आणि अदनान अजीम शेख (वय वर्षे 12) अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षाचालक अजीम शेख हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातग्रस्त सर्वजण बीड शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील अजीम शेख हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटे गव्हाण (ता. धारूर) येथे आपल्या सासरी गेले होते. रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा याठिकाणी समोरून येत असलेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षाला जोरदार धडक बसली.

अपघात एवढा भीषण होता की, रिक्षाचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कटेंनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT