भोकरदन (जि.जालना) : जालन्याला कामानिमित्त आलेल्या एका तरुणाकडचे पैसे संपल्याने गावाकडे घरी कसे जायचे? असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. आणि तो चक्क मजबुरीने जीवाची पर्वा न करता एसटी महामंडळाच्या बसला पाठीमागे लटकला. हा प्रकार जालना- भोकरदन मार्गावर आज मंगळवारी (ता.१४) दुपारी चार वाजेदरम्यान भोकरदन शहरातील एका व्यापाऱ्याला दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन (Bhokardan) शहरातील भुसार व्यापारी सांडू नामदे हे मंगळवारी जालना येथील बाजार समितीत कामानिमित्त गेले होते. (Man Hasn't Money So He Dangerously Travelled By ST Bus In Bhokardan Of Jalna)
दुपारी काम आटोपून ते लोडिंग वाहनाने भोकरदनकडे परतत असतांना त्यांना जालन्याकडून (Jalna) भोकरदनकडे जाणाऱ्या एका एसटी बसच्या (ST Bus) पाठीमागे असलेल्या शिडीला एक युवक लटकलेला दिसून आला. नामदे यांना काही वेळ हा काय प्रकार आहे हे समजेनासे झाले. त्यांनी चालू वाहनातूनच त्या लटकलेल्या युवकाला हातवारे करून काय अडचण आहे? असा का लटकला? अशी विचारपूस केली. तर त्यानेही तिकडून पैसे नसल्याने आपण या मजबुरीने प्रकारे लटकल्याचे हाताने ईशारा करून सांगितले. त्यावर नामदे यांनी त्याला माझ्यासोबत माझ्या गाडीत चल असा इशारा केला. मात्र, त्याने नकार देत हात जोडले. या सर्व प्रकारात महामंडळाची बस वेगाने पुढे निघून गेली. मात्र, मजबुरी माणसाला किती जीवावर खेळण्यास भाग पाडते. ते या वरून दिसून येते.
जीवनात पहिल्यांदा प्रत्यक्ष असा थरार अनुभवला. त्या तरुणाला हातवारे करून अनेकदा माझ्यासोबत माझ्या वाहनात ये असे म्हटले. मात्र, असा जीवघेणा प्रवास करण्याची त्याची नेमकी मजबुरी कळाली नाही. हातवारे करून त्याने पैसे नाही असे म्हणताच माझ्या अंगावर शहारे आले.
- सांडू नामदे, भुसार व्यापारी, भोकरदन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.