निलंगा (जि.लातूर) - शेतात पाणी साचले आहे. Latur Rain Updates
मराठवाडा

लातूर : मांजरा,तेरणाच्या पुरामुळे राज्यमार्ग बंद; वाहतूक खोळंबली

राम काळगे

निलंगा ( जि.लातूर) : तालुक्यातून (Nilanga) वाहणाऱ्या मांजरा (Manjara River) व तेरणा (Terna River) नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे अनेक राज्यमार्गावरील पुल (ब्रीज) पाण्यात गेली असल्यामुळे 12 तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दळणवळणाची सुविधा कोलमडली आहे. धरणातून पाणी सोडणे कमी केले असले तरी बुधवारी (ता.29) रोजी पाण्याचा प्रवाह 'जैसे थे' आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे धनेगाव (ता.केज) येथील धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात (Latur) आले होते. यातून सत्तर हजार 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामध्ये मसलगा (ता.निलंगा) मध्यम प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे मांजरा नदीपात्रात अधिक पाण्याची भर पडली आहे. या नदीकाठच्या 13 गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हालसी-तुगाव व चिचोंडी गावांना धोका होण्याची शक्यता असल्यामुळे काही कुटूंब पाण्याचा प्रवाह वाढल्यास हलवावे लागणार आहेत.

बसपूर-बाकली या पूलावरून पाणी पडत असल्यामुळे हा रस्ता बंद वाहतुकीला करण्यात आला आहे. शिवाय निलंगा ते शिरूरअनंतपाळ जाणाऱ्या रस्त्यावर उजेड (ता.शिरूर अनंतपाळ) येथील पूलावरून पाणी पडत असल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. तर निलंगा ते उदगीर जाणाऱ्या रस्त्यावर धनेगाव (ता.देवणी) येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक सकाळी बंद आहे. तर निलंगा ते कासारसिरसी मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग नऊकडील वाहतूक तेरणा नदीला पूर आल्यामुळे लिंबाळा (ता.निलंगा) येथील पूल पाण्याखाली गेला असल्यामुळे त्या मार्गावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. शिवाय पाण्याच्या प्रवाहामुळे ग्रामीण भागात जाणारे जिल्हाअंतर्गत मार्गही बंद असून अतिवृष्टीमुळे दळणवळणाची सुविधा ठप्प झाली आहे. गेल्या बारा तासांपासून हे राज्यमार्ग बंद अल्यामुळे त्या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

सालगडी आडकला

तालुक्यातील मुगाव - मसलगा गावाच्या मध्ये वांजरखेडा शिवारात मांजरी नदीच्या पुराचे पाणी चहुबाजूने असल्यामुळे शिवाजी भिमराव कुदरे हा व्यक्ती सालगडी म्हणून एकाच्या शेतात अडकल्याची माहीती रात्री प्रशासनाला मिळाली. सकाळी तहसीलदार गणेश जाधव व एनडीआरएफची टीम घटनेच्या ठिकाणी आले असून एक तासात बाहेर काढले आहे. कालच संबंधित सालगडी श्री. कुदरे यांनी आपले कुटूंब सुरक्षितस्थळी पाठवून ते घरी थांबले होते. मात्र पाण्याचा प्रवाह सर्व बाजूने वेढल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्कील झाले. अखेर माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ यांनी तत्काळ ही माहीती प्रशासनाला दिली. व त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहीती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT