Manoj Jarange Maratha Reservation esakal
मराठवाडा

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा बीपी लो! बीडमध्ये तणाव, एसटी बंद; वडीगोद्रीमध्ये मराठे रस्त्यावर

संतोष कानडे

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आंतरवाली सराटी येथे मागच्या आठ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे.

उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचं ब्लड प्रेशर डाऊन झालं आहे. उपोषणस्थळी गर्दी जमली असून उपोषण स्थगित करण्याची विनंती लोक करीत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

मराठा आंदोलक संतप्त झालेले असून वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बीडमध्ये तर एसटी प्रशासनाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक संतप्त असून सरकारने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. महिलांच्या डोळ्यात अश्रू असून पोटतिडकीने त्या उपोषण मागे घेण्याची विनंती करीत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, त्यासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी जरांगेंची मागणी आहे. परंतु सरकारने अद्यापही सगेसोयरे अधिसूचनेबाबत निर्णय घेतलेला नाही.

याशिवाय राज्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करावं, अशी जरांगे यांची मागणी आहे. त्यासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु अद्यापही त्याबाबत काहीही हालचाली दिसून येत नाहीत. हैदरबाद गॅझेट लागू झालं तर त्याच्यातील नोंदीनुसार मराठावाड्यातील लाखो मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

Nashik Cyber Fraud : इडीकडून अटकेची भिती दाखवून 90 लाखांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT