Manoj Jarange Patil news esakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil: माझा जीव गेला तरी... मनोज जरांगे यांना अश्रू अनावर, आंतरवाली सराटीत मोठी गर्दी

Sandip Kapde

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. "मला समाजाकडून काहीच नको. सरकार माझ्या मागे लागलं आहे. विरोधकही मागे लागलेत. पण जीव गेला तरी चालेल मागे हटणार नाही. मराठ्यांची शान कमी होऊ देणार नाही," असं त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे उपोषण स्थगित केले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

नेत्यांना बाप मानायचे बंद करा

मनोज जरांगे म्हणाले, "नेत्यांना बाप मानायचे बंद करा, जातील बाप माना. मी खंबीर आहे, मागे हटणार नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी मरायला देखील तयार आहे. मी कुठेही फिरतोय. आज पुण्याला जाणार आहे. माझ्यावर हल्ला झाला, रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी माझ्या तोंडात मराठा आरक्षण हा शब्द असणार आहे."

समाजाचा विश्वास

"समाजाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी विश्वासघात होऊ देणार नाही. समाजावर आलेलं संकट माझ्यावरील संकट आहे," असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा अविरत सुरु राहील असं देखील त्यांनी सांगितले.

नाट्य निर्मात्याची फसवणूक प्रकरण

2013 मध्ये नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे. वारंवार समज पाठवूनसुद्धा सुनावणीला हजर न झाल्यामुळे जरांगे पाटील यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं.

"वॉरंट इशू करू नये, दोन तारखेला हजर होऊ," असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे उद्या मनोज जरांगे कोर्टात हजर राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: "अंबानींची फाईल माझ्याकडं सहीसाठी आली होती, पण..."; सत्यपाल मलिकांचा खळबळजनक खुलासा

Dharavi Mosque: धारावी मशीद प्रकरण; बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला 8 दिवसांची मुदत, अन्यथा...

Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Mumbai University Senate Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT