Manoj Jarange esakal
मराठवाडा

Manoj Jarange : मराठा, दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर.., मनोज जरांगे सोशल इंजिनिअरिंगच्या तयारीत; ओवैसींच्या आवाहनाबद्दल म्हणाले...

Asaduddin Owaisi : मनोज जरांगे म्हणाले की, कुणाच्या प्रस्तावाचं मला काही कळत नाही. आपण समदुःखी बांधव आहोत. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर आणि इतर समाज.. आपण सगळे समविचारी आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन सरकारला दणका देण्याची गरज आहे. एकत्रित यायला समाज कधीच नाही म्हणाला नाही..मला काही नेते माहीत नाहीत. पण सगळे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल.

संतोष कानडे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला एक महिन्याला वेळ दिला होता. शनिवार, दि. १३ जुलै रोजी दिलेला वेळ संपला असून आता जरांगे पाटील २० जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. याच दिवशी मुंबईला होणाऱ्या आंदोलनाविषयी ते भूमिका स्पष्ट करतील.

रविवारी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांनी राज्यामध्ये मराठा, दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर आणि इतर समाजाची मोट बांधण्याविषयी भाष्य केलं आहे. शनिवारी ओवैसी यांनी जरांगेंना आवाहन करत त्यांनी निमंत्रण दिल्यास नक्की विचार करेन, असं म्हटलं होतं. त्यावरही जरांगे बोलले आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, कुणाच्या प्रस्तावाचं मला काही कळत नाही. आपण समदुःखी बांधव आहोत. दलित, मुस्लिम, लिंगायत, धनगर आणि इतर समाज.. आपण सगळे समविचारी आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन सरकारला दणका देण्याची गरज आहे. एकत्रित यायला समाज कधीच नाही म्हणाला नाही..मला काही नेते माहीत नाहीत. पण सगळे एकत्र आल्यास सगळ्या समाजाला न्याय मिळेल.

जरांगे पुढे म्हणाले की, नेत्यांना आवाहन करण्यापेक्षा सामान्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपण सत्ता परिवर्तन करू शकतो, वीस तारखेपर्यंत आम्ही पाहणार आहोत कसं जुळतं काय जुळतं ते. इतरांनी फोनची वाट पाहण्यापेक्षा आपला समाज कसा मोठा होईल, यासाठी एकत्र यायला हवं. कारण सगळे समाज एकत्र आले तर जातीवाद बंद होईल. स्वतःहून आलं तर आपली जात मोठी होईल. निमंत्रण देण्यापेक्षा आपण स्वतःहून एकमेकांच्या जवळ आलं पाहिजे.

''भविष्यात प्रकाश आंबेडकर, ओवैसी माझ्यासोबत एकत्रित येतील का हे मला माहित नाही, मात्र माझं मत आहे एकत्र यावं बदल घडेल. तुम्ही नाही आले तर आम्ही पाडायला मोकळे आहोत. मी प्रस्ताव-फ्रस्ताव देण्याच्या भानगडीत पडत नाही, मात्र सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटतं. प्रश्न समाजाचा आहे सर्वांनी उडी घ्यायची जास्त विचार करायचं नाही जे होईल ते होईल.''

बीडच्या राजकारणाबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांना पाडा, असं मी म्हटलं नाही. मिस्त्री मुस्लिम, त्याच्याखाली टोपले उचलायला मराठ्याचा पोरगा, किती दिवस त्यांनी अन्याय सहन करायचा. दलित मुलांनी किती दिवस कामगार म्हणून राहायचं? आरक्षण असून फायदा का होत नाही, याचा विचार बंजारा समाजाने करण्याची गरज आहे.

''23 जुलै रोजी होणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या हुतात्मा दिनाला सर्व समाजबांधवांनी जावं, मराठा आरक्षणासाठी जितके बलिदान दिले गेले त्या सर्वांचे स्तंभ त्या ठिकाणी उभारण्याचं त्यांनी ठरवलंय, त्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे शांततेत सर्वांनी कार्यक्रमात जावं ही विनंती.'' असंही आवाहन शेवटी जरांगेंनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT