manoj jarange patil hunger strike again for maratha reservation sakal
मराठवाडा

Manoj Jarange Hunger Strike : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे पुन्हा उपोषण सुरु, दखल घेतली नाही तर मोठा निर्णय घेणार

दिलीप दखने

वडीगोद्री : मराठा समाजाला आरक्षण द्या, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, हैदराबादसह तिन्ही संस्थानचे गॅजेट लागु करा,शिंदे समीतीला मुदतवाढ, गुन्हे वापस घेणे,आदी मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी पुन्हा शनिवार ता.20 रोजी आमरण उपोषण चालू केल आहे.

मनोज जरांगे यांनी सांगितले की, सरकारला पाहिजे तेवढा वेळ दिला अद्याप शासन निर्णय घेत नाही कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही जे प्रमाणपत्र आहे त्याची व्हलीडीटीसाठी अडचणी आहेत, ईडब्ल्यूएस बंद करू नका ते चालू ठेवणे गरजेचे आहे, सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत म्हणजे मोफत शिक्षण द्या त्यात अटी,

शर्ती ठेवु नका सगे सोयरे बाबत ज्या हरकती प्राप्त झाल्या आहेत त्या बाबत शासनाने बघावे आम्हाला आरक्षण द्या येत्या काळात अंतरवाली सराटीत जे आंदोलन चालू आहे त्याला एक वर्ष होत आहे या दिवशी समाज बांधवांना बोलावुन मोठा निर्णय घेतला जाईल विधानसभा निवडणूक मध्ये उभे राहायचे का पाडायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे जरांगे यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांची जनजागृती यात्रा सुरु आहे तो त्यांचा अधिकार आहे ते नेहमी वंचीतासाठी काम करतात ते वंचीतांचा नक्की विचार करतील त्यांच्या बाबतीत मी नाराज नाही त्यांनी गरजवंताच्या पाठीशी उभे राहावे शासनाने निवडणूक डोळ्या समोर लाडकी बहीण, भाऊ आदी योजनाची घोषणा केली असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

जरांगे यांची प्रमुख मागणी

(1) सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी

(2) नोंदी शोधून प्रमाणपत्र वाटप करावे

(3) शिंदे समीतीला मुदतवाढ द्यावी, जे कर्मचारी, अभ्यासक, यात काम करतात त्यांना पगार द्यावा

(4) दाखल गुन्हे वापस घ्यावे, खोटे गुन्हे दाखल करू नये

(5) मुलींना सरसकट मोफत शिक्षण घ्यावे अटी,शर्ती ठेवु नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT