मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सर्वांच्या परिचयाचे आहेत. आपल्या मागणीवर ठाम असून ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. शनिवारी बीडमध्ये इशारा सभा पार पडली. या सभेतून त्यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली. त्यांनी मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जरांगे यांचा क्रिकेटच्या मैदानात वेगळा अंदाज दिसून आला.(Latest Marathi News)
जरांगे पाटील मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसले. यावेळी त्यांनी बॅटिंग, बॉलिंग देखील केली. जरांगे पाटील यांची चांगले क्रिकेटपटू म्हणून देखील ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामुळे त्यांना क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नाही. आंदोलन, उपोषण, दौरे, सभा यामध्ये ते व्यस्त होते.
मैदानावर हातात बॅट घेत अंतरवाली सराटी येथील आपल्या मित्र कंपनीसोबत त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी बॅटिंग, बॉलिंग देखील केली. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ दिला होता. ती डेडलाईन आज संपत आहे, या पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली. (Marathi Tajya Batmya)
आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली.(Latest Maharashtra News)
मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही, असे जरांगे म्हणाले. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.