Maratha Kranti Morcha decided to raise awareness in villages upcoming Dasara melava phulambri sakal
मराठवाडा

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यासाठी गावागावात जनजागृती करणार; फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

नवनाथ इधाटे

फुलंब्री : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील श्री क्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्याला तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधव उपस्थित राहण्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करणार असल्याचा एकमुखी निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत बुधवारी (ता.तीन) करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुलंब्री येथील सकल मराठा समाज बांधवांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित राहिले.

मराठा आरक्षणासाठी नवरात्र झटणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड मधील श्रीक्षेत्र नारायणगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी फुलंब्री तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

फुलंब्री तालुक्यातील प्रत्येक गावागावात जाऊन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जनजागृती केली जाणार आहे. तसेच या जनजागृतीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना एकत्र करण्याचा प्रयत्न क्रांती मोर्चा च्या वतीने केला जाणार आहे. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील मराठा, मुस्लिम व धनगर समाज बांधवांनी बीड येथील नारायण गड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी नंदू मोटे, किशोर बलांडे, सोमनाथ करपे, योगेश पाथ्रीकर, संतोष तांदळे, दत्तू नाना करपे, योगेश शिरसाठ, जगन्नाथ दाढे, श्रीराम म्हस्के, शिवाजी खरात, अजित भोपळे, निलेश बलांडे, गजानन इधाटे, बापूराव म्हस्के, विठ्ठलराव कोलते, कृष्णा गाडेकर, ऋतिक डीडोरे, संतोष जाधव, ओंकार साळुंखे, लहाने यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

सर्कल निहाय जनजागृती

  • वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कल : चार व पाच ऑक्टोबर 2024

  • बाबरा जिल्हा परिषद सर्कल : सहा व सात ऑक्टोबर 2024

  • पाल जिल्हा परिषद सर्कल : आठ व नऊ ऑक्टोबर 2024

  • गणोरी जिल्हा परिषद सर्कल : दहावा अकरा ऑक्टोबर 2024

या कालावधीत तालुक्यातील गावागावात जनजागृती केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही विश्वस्तांना झाली अटक

Baramati: शाळा महाविद्यालयांबाहेर वावरणा-या शालाबाह्य मुलांवर कारवाई होणार

Pune Crime: बाणेरमधील भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates : यूपीच्या बरेलीमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट

SCROLL FOR NEXT