Raj Thackeray Esakal
मराठवाडा

Raj Thackeray: मराठा आंदोलक आक्रमक! जालन्याला जाताना राज ठाकरेंच्या ताफ्याला तीनवेळा घ्यावा लागला ब्रेक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलकांवर जालन्यामध्ये पोलिसांनी लाठीमार केला याचे पडसाद गेल्या ३ दिवसांपासून दिसून येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात, शहरात बंद पुकारण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक भागात आंदोलन केले जात आहे. त्यामुळे ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील अनेक नेते जालन्यात आंदोलकांच्या भेटीसाठी जात आहेत. आतापर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले, गिरीश महाजन या नेत्यांनी जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात जात आहेत.

या संपुर्ण प्रकरणानंतर मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे जालन्याला जात असतानाच आंदोलकांनी तीन वेळा त्यांचा ताफा थांबवला आहे.

राज ठाकरे हे सकाळी जालन्याकडे निघाले. राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने चालू असतानाच राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजल्यानंतर आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा थांबवला. राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. राज ठाकरेंनी त्यांना शांत राहण्याचं आवाहनही यावेळी केलं आहे.

आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदन दिलं. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला. त्यानंतर पुढे दाभरूळ गावात पुन्हा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली.

त्यानंतर पुढे पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा थांबवण्यात आला. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवादही साधला. मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT