Maratha Reservation Case esakal
मराठवाडा

Maratha Reservation : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून मराठ्यांचं आंदोलन; जरांगेंचा फोन आला अन् त्यांनी..

शीतलकुमार शिंदे

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी आंदोलकांच्या जवळ जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

धाराशिव : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून जोरदार आंदोलन केले. घोषणाबाजी केली. जरांगेंच्या आंदोलनाची दखल दोन दिवसांत न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, जारांगेनी आंदोलकांशी मोबाईलवरून बोलून समजूत काढल्याने आंदोलक इमारतीच्या खाली उतरले.

सोमवारी (ता. १०) सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मराठा आरक्षणाबाबत येत्या दोन दिवसांत शासनाने सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा या निवेदनात उल्लेख करण्यात आला होता. मात्र, आंदोलनाच्या स्वरूपाचा उल्लेख त्यात नव्हता. दरम्यान, बुधवारी (ता. १२) सकाळी साडेदहा वाजता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढले. तिथून त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मग हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला.

दरम्यान, आवश्यक पोलिसांनी तिथे धाव घेऊन खाली जाळी लावली होती. मात्र, आंदोलक इमारतीच्या खाली येण्यास तयार नव्हते. एक आंदोलक तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढला होता. पाच वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी आंदोलकांच्या जवळ जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, मनोज जरांगे यांचा एका आंदोलकांच्या फोनवर कॉल आला. त्यांनी आंदोलकांची समजूत घातली. त्यांना अंतरवली सराटीला येण्यास सांगितले. यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या हाती असलेले जात वैधता प्रमाणपत्र आणि नोंदी शोधण्याचे काम या मागण्या जिल्हाधिकारी ओंबासे यांनी मान्य केल्या आहेत. उर्वरित वरिष्ठ पातळीवरील मागण्या शासनाला कळविण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले आहे. दरम्यान, हे आंदोलक जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटीला रवाना झाले आहेत. हे आंदोलनअमोल जाधव, प्रकाश पाटील, अक्षय नाईकवाडी, तेजस बोबडे, मनोज जाधव व अभिजित सूर्यवंशी यांनी केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT