MLA Haribhau Bagade sakal
मराठवाडा

Maratha Reservation : काँग्रेस-राष्ट्रवादीच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी! आमदार हरिभाऊ बागडेंचा अधिवेशनात आरोप

1902 मध्ये शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण दिले होते. त्यानंतर 1942 मध्ये 208 जातीचा समावेश करण्यात आला. त्यात 149 व्या क्रमांक मराठ्यांचा होता.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - 1902 मध्ये शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण दिले होते. त्यानंतर 1942 मध्ये 208 जातीचा समावेश करण्यात आला. त्यात 149 व्या क्रमांक मराठ्यांचा होता. मात्र 1962 मध्ये सत्ताधाऱ्यांनी कशाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षणातून काढले. पारतंत्र्यात मराठा गरीब होता अन् स्वतंत्र झाल्यावर अचानक कसा श्रीमंत होणार? हे सर्वसामान्य नागरिकांना कळायला पाहिजे.

काँग्रेस-राष्ट्रवादी तरुणांचे माथे भडकविण्याचे काम करतेय आणि त्यातूनच असे आंदोलने घडतेय, याला जबाबदार तत्कालीन राज्यकर्ते असून मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस राष्ट्रवादीच असल्याचा घनाघाती आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (ता.१४) रोजी अधिवेशनात केला.

फुलंब्री विधानसभेचे आमदार हरिभाऊ बागडे अधिवेशनात म्हणाले की, मराठ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. मात्र त्यावेळी 1902 मध्ये शाहू महाराजांनी मराठ्यांना आरक्षण दिले. मात्र त्यानंतर 1942 मध्ये पुन्हा 208 जाती समाविष्ट करण्यात आल्या होत्या यात 149 वी जात मराठ्यांची होती. मात्र 1962 ला कशाच्या आधारावर तात्कालीन सरकारने आरक्षण काढले.

पारतंत्र देश होता तेव्हा मराठा गरीब आणि अचानक श्रीमंत कसा होईल. 13 ऑक्टोबर 1967 ला नवीन परिपत्रक काढले त्यात कुणबी शब्द टाकला. मराठवाड्यात प्रमाणपत्र त्यानंतर देण्यात आलेच नाही. त्यानंतर पुन्हा 2004 ला बदल करून कुणबी मराठा, मराठा कुणबी असा बदल करण्यात आला. आजही मराठवाड्यात स्वातंत्र्य पूर्वीच्या काळातील मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहे.

तत्कालीन सरकारने 15 मार्च 1993 ला खात्री समिती नेमली त्यावेळी सर्वेक्षण केले मात्र मराठा आरक्षणाची शिफारस केली गेली नाही. अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली त्यावेळेस किमान विचार करून आरक्षण देणे गरजेचे होते. पण सत्ताधाऱ्यांनी तसे केले नाही. 2010, 2012, 2013 मध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली त्यावेळेस वरच्या सभागृहात मुख्यमंत्री का गेले नाही. लक्षवेधीला सुद्धा मुख्यमंत्र्याची ओरड झाली होती.

पण तत्कलिन मुख्यमंत्री सभागृहात न जाता संबंधित मंत्री सक्षम असल्याचे उत्तर दिले. 2012 ला राणे समिती नेमली. 2014 मध्ये कायदा न करता केवळ अध्यादेश काढला त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने तरुणांचे माते भडकविण्याचे काम केले. त्यातूनच हे असे सगळे आंदोलन घडत राहिले.

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे सर्वांना समजणे गरजेचे असून मराठा समाजाचे नुकसान काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केले असल्याचा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी अधिवेशनात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT