Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका - मनोज जरांगे-पाटील

बाळासाहेब लोणे

गंगापूर - मराठा समाजाची गेल्या दोन पिढ्यांची आरक्षणाची मागणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता आरक्षण दिल्याशिवाय सरकारची सुटी नाही. आमच्या हक्काचे आम्हाला कसे देत नाही, ते पाहून घेऊ, मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (ता. ११) शहरात आयोजित सभेत दिला. प्रारंभी कायागव येथील काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

मराठा आणि कुणबी एकच आहेत, इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण हवे आहे, त्यासाठीच सरकारला महिनाभर नव्हे, ४० दिवसांची मुदत दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेवर असलेल्या जरांगे-पाटील आमचे उपोषण वास्तव मागणीसाठी आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याच्या नोंदी सर्वत्र आहेत.

मराठवाड्यात ऊर्दू, फारसी, मोडी अशा विविध भाषांतील कागदपत्रांत या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेल्या आहेत. त्यामुळे उपोषणावेळी चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसांचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो.

मात्र, सातत्याने टिकणारे व कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण हवे तर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी द्या, असे राज्य सरकारचे प्रतिनिधी मंडळ सांगत होते. सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याचा कालावधी देण्याचा ठराव करावा, असा आग्रह धरला.

त्यानुसार मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय होऊन सर्वपक्षीय नेत्यांनी विनंती केल्यावर आम्ही ३० नव्हे, तर ४० दिवसांचा कालावधी सरकारला वाढवून दिला आहे. मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. येथील मेळाव्यासाठी हजारो संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते.

जाळपोळ, दंगल ,आत्महत्या हे मार्ग स्वीकारू नका

शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आला आहे.शांततेच्या मार्गाने आपण केलेल्या मागणीची आणखी वाट पाहू. जाळपोळ, दंगल ,आत्महत्या हे मार्ग स्वीकारू नका.

आपल्या मागणीचा योग्य विचार मान्य न झाल्यास शासनाच्या छाताडवर बसून आरक्षण मिळवू असे आव्हान करीत त्यांनी आगामी जालना येथे होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील समाज बांधवांनी समाजाची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

SCROLL FOR NEXT