Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: 'त्या 40 दिवसात कामच केलं नाही म्हणणं चूक, सरकारने...'; शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणासाठी 23 बैठका, सरकारवरील आरोपांवर शंभूराज देसाई यांचं उत्तर

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात पेटला आहे. अनेक भागात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. पण या काळात सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारने निर्णय न घेतल्याने आक्रमक झालेल्या मराठा समाज सरकारवर टीका केली आहे. सरकारवर होणाऱ्या या टीकेला मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

पत्रकार परिषद घेत मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाबाबत त्या 40 दिवसात सरकारने काम केलं नाही म्हणणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी 23 बैठका घेतल्या, मराठा आरक्षणासाठी समिती गठीत केली. त्यांना लागणारी सर्व यंत्रणा उभी केली. त्यामुळे सरकारने काहीच केलं नाही, असं म्हणणं योग्य नाही असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी माझी भूमिका मांडत आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीला गेल्यानंतर उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला. या 40 दिवसांमध्ये सरकारने काहीच काम केलं नाही, असं भासवलं जात आहे. मात्र या 40 दिवसात सरकारने काम केलं आहे. मराठा आरक्षणासाठी समिती गठीत केली. त्यांना लागणारी सर्व यंत्रणा उभी केली. त्यामुळे सरकारने काहीच केलं नाही, असं म्हणणं योग्य नाही, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोललेत. सध्या तेलंगणामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे कागदपत्रे देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षण सर्वच मराठा बांधवांना दिलं पाहिजे, असं देसाई म्हणालेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

लग्नाला 20 वर्षं उलटूनही पंकज त्रिपाठींच्या आईने सुनेला स्वीकारलं नाही ; 'हे' आहे कारण

Sports Bulletin 25th October: भारताला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचे प्रयत्न ते आयपीएल लिलावापूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत

Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

Latest Maharashtra News Updates Live : कुजलेले काजू, सुकामेव्याचा वापर करून मिठाई बनवणाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT