Maratha Reservation 
मराठवाडा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारचा नवा GR; सरकारने पुन्हा वेळ मागितला, खोतकर काय म्हणाले?

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी काल (शुक्रवार) मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये चर्चा झाली. दरम्यान आज सरकारचे आणि मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ अंतरवली सराटी येथे दाखल झाले आहे. सरकारकडून जरांगे यांना पत्र देण्यात आले आहे. जरांगे यांनी सरकारने सुधारित जीआर काढण्याची मागणी केली होती. दरम्यान सरकारच्या वतीने माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्र वाचून दाखवले.

अर्जुन खोतकर म्हणाले, मी देखील या उपोषणामध्ये सहभागी आहे. पहिल्या दिवसापासून मनोज पाटील यांची आम्ही काळजी घेत आहोत. शासनासमोर हा प्रश्न मांडत आहोत. मुख्यमंत्र्यांनी देखील जबाबदारी मला दिली आहे. मनोज जरांगे यांच्या सुचनेबाबत (शुक्रवार) रात्री बैठक झाली. आम्ही नवीन जीआर काढला. संपूर्ण लढा यशाच्या मार्गाने गेला पाहिजे. अनेक पिढ्या मनोज पाटील यांच्या लढ्याचा इतिहास सांगतील.

सरसकट आरक्षणाची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. तसेच वंशावळीचा मुद्दा आणि सरसकट आरक्षणाबाबत जरांगे आग्रही होते. कालच्या बैठकीत ज्यांच्या नोंदी नाहीत. त्यांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितला आहे. समाजातील तज्ज्ञ लोकांनी समितीला मदत करावी, समिती संभाजीनगरला बसून काम करेल, असे खोतकर म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की जोपर्यंत निवृत्त न्यायाधीशांचा अहवाल येत नाही तोपर्यंत २००४ च्या जीआर अत्यंत प्रभावीपणे राबवावा.  २००४ च्या जीआरमध्ये तातडीने सुधारणा करण्यात येतील. काल (शुक्रवार) याबाबत चर्चा झाली. शिंदे समितीने देखील वेळ मागितला आहे. समितीला काम करण्याची संधी जरांगे पाटील यांनी द्यावी, अशी विनंती अर्जुन खोतकर यांनी सरकारच्या वतीने केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT