Chakkajam Agitation kalamb sakal
मराठवाडा

Maratha Reservation : कळंब तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन

आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने कळंब तालुक्यात आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे.

दिलीप गंभिरे

कळंब - आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने कळंब तालुक्यात आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. गुरुवारी लातूर कळंब मार्गावर लातूर आगाराच्या बसवर दगडफेक केल्याने शुक्रवार (ता. १६) विविध मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने आगारात शुकशुकाट निर्माण झाला होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळाले.

तालुक्यातील देवळाली येथील शेकडो समाजबांधवांनी कळंब ढोकी मार्गावर रास्ता रोको करून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील हावरगाव येथे रस्तत्यावर झाडी तोडून टाकण्यात आली. यामुळे चार तास या हासेगाव - इटकूर पारा मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती.

लातूर-कळंब-भाटसांगवी मार्गावर खोंदला, सत्रा परिसरातील मराठा समाज एकत्र येत खोंदला पाटीवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालूक्यातील मोहा येथे शेकडो समाज बांधवांनी घोषणा देत चक्का जाम आंदोलन केले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली होती.

गुरुवारी कळंब पासून जवळ असलेल्या खडकी गावात लातूर कळंब मार्गावर एसटी बस फोडल्याचा प्रकार घडल्यामुळे सकाळ पासून कळंब आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. जवळपास सर्वच आगारांतून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या.

दरम्यान, कळंब येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच फोटोंना काळे फासून संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन पेटू लागले आहे.

कळंब शहरात चक्का जाम आंदोलन

आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आरक्षणाचा लढा उभा करणाऱ्या पोशिंद्याच्या जीवाला काही झालं तर सरकारला सुट्टी नाही, अशा विविध घोषणाबाजीने कळंब शहर दणाणून गेले होते. कळंब ढोकी रस्त्यावर शेकडो बांधव जमा होऊन रास्तारोको करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठा समाजाने ठिय्या मांडला होता.

सर्वसामन्याचे नियोजन कोलमडले

मागील दोन दिवसांपासून आरक्षण मुद्दा पेटला आहे. त्याचे पडसाद कळंब तालुक्यातील बहुतांश गावात जोरदार उमटले आहेत. प्रत्येक जण आरक्षण मुद्दा चर्चेला घेत आहे. दरम्यान कळंब आगाराची एकही बस मार्गावर सोडण्यात आली नाही. तर बहुतांश मार्गावर आंदोलन पेटल्याने सर्व सामान्य जनतेचे नियोजन कोलमडल्याने पहावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT