maratha reservation kunbi record in Nizam era gazette 38 percent Kunbi-Maratha in 1901 in Dharashiv  Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : निजामकालीन गॅझेटमध्ये ‘कुणबी’ नोंद; धाराशिव जिल्ह्यात १९०१ मध्ये ३८ टक्के कुणबी-मराठा

धाराशिवसह बीड जिल्ह्यातील सर्व मराठा समाज कुणबी असल्याचा उल्लेख निजामकालीन इम्पेरियर गॅझेटमध्ये असल्याचे निदर्शनास

सयाजी शेळके

धाराशिव : धाराशिवसह बीड जिल्ह्यातील सर्व मराठा समाज कुणबी असल्याचा उल्लेख निजामकालीन इम्पेरियर गॅझेटमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना गुरुवारी (ता. सात) सादर केला आहे. त्यामुळे आता दोन्ही जिल्ह्यांतील मराठा नागरिकांना सरसकट ‘कुणबी’ प्रमाणपत्र मिळणार का? याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे.

अंतरवाली सराटी येथील उपोषणाने महसूल प्रशासन कामाला लागले आहे. मराठा समाजातील नागरिकांच्या जुन्या दस्तऐवजांवर कुणबी असा कुठे उल्लेख आढळतो का, याबाबत प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. तहसील कार्यालयातील तलाठी, नायब तहसीलदार यांच्यासह इतर कर्मचारी याचा शोध घेत आहेत.

कशी आहे नोंद?

निजामकालीन हैदराबाद स्टेटचे १९०९ चे गॅझेट आहे. यामध्ये विविध बाबींचा उल्लेख आहे. गॅझेटमधील पान क्रमांक २६२ व पान क्रमांक २६३ वर धाराशिव जिल्ह्याच्या लोकसंख्येचा तालुकानिहाय तपशील दिला आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कुणबी (मराठा) असा उल्लेख करण्यात आला आहे.

ही लोकसंख्या दोन लाख पाच हजार म्हणजेच जिल्ह्यातील एकूण लोकसंखेच्या ३८ टक्के असे दर्शविले आहे. शिवाय अन्य जातीची लोकसंख्या नमूद केली आहे. तसेच गॅझेटच्या २३४ व्या पानावर औरंगाबाद विभागाची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील लोकसंख्येचा उल्लेख आहे. मराठा समाजाच्या लोकसंख्येचा उल्लेख करताना मराठा-कुणबी असा उल्लेख आहे. जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख ९२ हजार असून यामध्ये मराठा-कुणबी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक एक लाख ९६ हजार म्हणजेच ३९ टक्क्यांपेक्षा जास्त असा उल्लेख आहे. दोन्ही जिल्ह्यांतील मराठा समाजातील सर्वच नागरिक कुणबी आहेत, असाच यातून बोध होत असल्याचे दिसत आहे.

माझ्याकडे १९०९ मधील निजामकालीन गॅझेट आहे. यामध्ये औरंगाबाद विभागातील बीड जिल्ह्याचा उल्लेख असून त्यावर जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख दिसत आहे. याबाबतची माहिती प्रशासनाला दिली आहे.

- सतीश कदम, इतिहास संशोधक, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT