Manoj Jarange eSakal
मराठवाडा

Manoj Jarange: मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीसांच्या...'; मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यानंतर 'बॉम्ब' फोडणार

कार्तिक पुजारी

नांदेड- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, 'आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. राज्यातील मराठा आता मुलांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये?'

जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली. मी त्यांना समजून सांगितले आहे. त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो काढावा. ते जनतेशी खुनशीने वागतात हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यांच्यामुळे गरिबांचे वाटोळे होते. हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यांना वाटतं नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली. आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केलं आहे. फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? असं जरांगे म्हणाले.

मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात त्यामुळे समाजात नाराजी आहे. मंत्री म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही, म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार हेच. म्हणजे सगेसोयरे अंमलबजावणी हे देणार आणि आणखी उडवणार हे नक्की आहे. सरसकटने यांचं फार पोट दुखतं, सगे सोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील. आम्हाला गॅझेट सुद्धा लागू पाहिजे, असं ते म्हणाले.

शंभूराजे देसाई यांना काल रात्री बोललो आहे. गॅझेट अंमलबजावणी होणार असं त्यांनी सांगितलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणी आमच्या पद्धतीने आम्हाला हवी असं त्यांना आम्ही सांगितलं. डेड लाईन बद्दलकाहीही चर्चा झाली नाही ते देतील आणि टिकवतील. सौम्य पद्धतीने मी सरकारवर टीका करावी अशी कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मागण्यांवर अंमलबजावणी करावी, असं जरांगे म्हणाले.

मराठा समाजातील शेवटचा माणूस सगे सोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही. मुख्यमंत्र्यांना मी 4-5 दिवसांपूर्वी बोललो होतो.जो मुलींसाठी 100 टक्के मोफत शिक्षण केलं होतं त्यांची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचं अभिनंदन, सगळ्यांच्या लेकी-बालींना त्यांच्यामुळे न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचं कौतुक, पण अँडमिशन घेताना जी मुलींची फिस घेतली ती परत करा, असं ते म्हणाले.

पावसात देखील मराठे रॅलीत येणार कारण आमची आरक्षण ही वेदना आहे. काम बंद ठेऊन रॅलीत या. मराठाच राज्यात किंग राहिला पाहिजे. आमच्या विरोधात गेलेल्यांना पाडण्याची आमच्यात ताकद आहे. 2-3 टप्पे होऊ द्या मग बॉम्बच फोडणार आहे. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देत नाही, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan : पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीसाठी बाहेर पडताय ? पार्किंग कुठे करायचं ? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग एका क्लिकमध्ये

IND vs BAN: भारतीय संघ ३ फिरकीपटूंसह पहिली कसोटी खेळणार? अश्विन-जडेजासह तिसरा कोण हेही ठरलं; जाणून घ्या Playing XI

Latest Maharashtra News Live Updates: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

दुसऱ्यांच्या मुलीही इथे मार खायला आलेल्या नाहीत... इंस्टावर लाइव्ह येत आर्याने काढली सगळ्यांची खरडपट्टी

Salman Khan : सलमानच्या टीमने अमेरिकन फॅन्ससाठी जारी केला अलर्ट ! काय आहे कारण ? घ्या जाणून

SCROLL FOR NEXT