manoj jarange patil meeting sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या

आडगाव सरक येथील जनजागृती सभेत मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

संतोष शेळके

करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर) - मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन टिकणारे मराठा आरक्षण द्या असे प्रतिपादन बुधवारी (ता. 11) मराठा आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आडगाव सरक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे झालेल्या मराठा आरक्षण जनजागृती सभेत जमलेल्या हजारो मराठा बांधवाच्या उपस्थितीत केले.

अंतरवली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी आयोजित सभेच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची आडगाव सरक येथे बुधवारी सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाने मराठा समाजातील लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र येऊन आरक्षण काय आहे. हे प्रत्येक घरा-घरातील मराठा बांधवांनी समजून घेण्याची गरज आहे. ते या सभेच्या माध्यमातून सर्व मराठा समाजापर्यंत पोहोचले असून त्यामुळेच सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा होत आहे. सरकारने आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ मागितला, आपण त्यांना 40 दिवस दिले आहेत. आणि आता आपण टिकणारे आरक्षण घेतल्या शिवाय शांत बसणार नाही.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला आहे. या संधीचे आपल्याला सोने करायचे आहे. हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मात्र, सरकारमधील काही लोक या आंदोलनाला गालबोट कसे लागेल याच्या तयारीत आहे. समाजाच्या या आंदोलनाला कुठेही गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहनही यावेळी श्री. जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

या सभेला भर उन्हात मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव उपस्थित होते. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी त्यांची तब्येत खराब असल्याने आडगाव सरक येथील सभेला येण्यास वेळ होऊन सकाळी नऊ वाजेची सभा दोन वाजेला सुरु झाली. यावेळी सभेच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सभेस प्रारंभ करण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला आडगाव सरक येथील सकल मराठा समाजाच्या वतीने श्री. जरांगे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला व मुलींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. यावेळी आडगाव सरक, लाडसावंगी परिसरासह तालुक्यातील हजारो मराठा बांधवांची उपस्थिती होती.

थोडी कळ सोसा मात्र आत्महत्या, जाळपोळ, दंगल, हे मार्ग स्वीकारू नका

आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी आपली शांततेच्या मार्गाने वाटचाल सुरू असून पुढेही याच मार्गाने आपल्याला जायचे आहे. त्यामुळे थोडी कळ काढा मात्र चुकूनही आत्महत्ये सारखा मार्ग स्विकारू नका, नाही तर ही आरक्षणाची लढाई कशासाठी.

याशिवाय कुठेही जाळपोळ व दंगल घडणार नाही याची काळजी घेत 14 तारखेच्या अभूतपूर्व व 'न भूतो न भविष्यती' सभेसाठी शिवाय या सभेच्या नियोजन व यशस्वीतेसाठी समाजाची सेवा म्हणून जिल्ह्यातील समाज बांधवांनी स्वयंसेवक म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी केले.

महिलांची मोठी उपस्थिती; 15 एकरची जागाही अपुरी

सभेसाठी आडगाव सरक परिसरातील सुमारे 15 एकर जागेचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, शेवटी ही जागाही आजच्या उपस्थित संख्येने कमी पडल्याचे दाखवुन दिले. शिवाय या सभेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले ते मुली व महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती.

आयोजक समितीने योग्य नियोजन करून महिलांसाठी वेगळी बैठक व्यवस्था केली गेली होती, दरम्यान अपेक्षेपेक्षाही महिला वर्गाची उपस्थिती चक्रावून सोडणारी ठरली. सोबतच, आबाल, वृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT