Jintur: अंतरवाली सराटी (जि.जालना) येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ व आरक्षणासाठी शासनाच्या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजबांनी बुधवारी (ता.२४) येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मागील पाच दिवसांपासून मराठा योद्धा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत असुन त्यासाठ मागील अनेक वर्षांपासून उपोषणे,आंदोलने करून त्यांची प्रकृती क्षीण झाली.
त्यांच्या कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दामहून काही एक विचार करत नसताना दिसत आहे शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने मराठा समाजामध्ये सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जोपर्यंत सरकार मराठा समाजाच्या व जरांगे पाटील यांच्या मागण्या तत्वतः मान्य करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारने लवकर सरकारने सगेसोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी,मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर मागण्या मराठा समाजाच्या वतीने करत जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनस्थळी तहसिलदार राजेश सरवदे नायब तहसिलदार प्रशांत राखे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख,पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.