Maratha Reservation 
मराठवाडा

Maratha Reservation: आरक्षण नको पाणी घ्या; मराठा आंदोलकांची मनोज जरांगेंना भावूक होत विनंती

Sandip Kapde

Maratha Reservation: आंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. पाणी देखील पीत नसल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे मराठा आंदोलकांनी जरांगेनी पाणी घ्यावं आम्हाला आरक्षण नको, अशी विनंती केली आहे.

आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी मराठा आंदोलकांना अश्रू आनावर झाले. "दादा माझी एकच विनंती आहे. फक्त पाणी घ्या...आरक्षणाची आम्हाला गरज नाही. आमच्या मनगटात बळ आहे. आम्ही लढू शकतो जगू शकतो. फक्त दादा तुम्ही पाणी घ्या", अशी विनंती मराठा आंदोलकांनी केली आहे. यावेळी एक घोट पाणी घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आम्हाला आरक्षण नको, आम्हाला आमचा राजा हवा, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या. समस्त मराठा बांधवांकडून विनंती आहे की पाणी घ्या...असे फलक देखील उपोषणस्थळी लावण्यात आले आहेत.

आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात

31 ऑक्टोबरनंतर आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याचे मनोज जरंगे यांनी जाहीर केले आहे. मग सरकारचा मार्ग अधिक खडतर होईल. सामुहिक उपोषणाला बसलेले लोक पाणी पिऊ शकतात. त्याचबरोबर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदार, माजी आमदारांनी सरकारवर दबाव आणावा, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या जलद जागेवर नवीन 10 सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. दुसरीकडे, मराठा आरक्षणावरून सुरू असलेली कोंडी येत्या दोन दिवसांत संपेल, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

MVA Seat Sharing Formula : मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तिसऱ्यांदा बदलणार! थोरात म्हणाले, अजून बेरीज...

Hardik Pandya मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? आयपीएल रिटेंशनआधी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT