Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मनोज जरांगे पुन्हा मैदानात! राज्यभर करणार दौरे, असा असेल पुढचा प्लॅन

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती, ते अशक्त झाले होते.उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना त्यांनी पुढे काय कारायचं हे सांगितलं आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, 'आता आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपलं साखळी आंदोलन सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

१ डिसेंबरपासून साखळी उपोषण करणार असल्याचंही सांगितलं आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे.

तर पुढे म्हणाले की, कोणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झाला आहे. हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.

सरकारचे शिष्टमंडळ सोमवारी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येणार आहे. राज्यात प्रथमच एकाच वेळी तीन समित्या काम करत आहे. मागावर्गीय आयोग, शिंदे समिती आणि न्यायमूर्तींची समिती काम करत आहे. यामुळे आता पूर्ण आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT