maratha reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : सगळे काम बाजूला, आता फक्त आरक्षण ; महिनाभराचा शिधा घेऊन हजारो समाज बांधव निघाले मुंबईला

घरची, शेतीची सगळी कामे बाजूला ठेवत मराठा समाज एकजुटीने मराठा आरक्षणासाठी एकत्र येऊन शनिवारी (ता. २०) अंतरवाली सराटी येथून मुंबई निघाला आहे. विशेष म्हणजे मुंबईला जाताना मराठा समाजबांधवांनी स्व-खर्चातून महिनाभर पुरेल एवढे धान्य आणि इतर शिधा सोबत घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना : घरची, शेतीची सगळी कामे बाजूला ठेवत मराठा समाज एकजुटीने मराठा आरक्षणासाठी एकत्र येऊन शनिवारी (ता. २०) अंतरवाली सराटी येथून मुंबई निघाला आहे. विशेष म्हणजे मुंबईला जाताना मराठा समाजबांधवांनी स्व-खर्चातून महिनाभर पुरेल एवढे धान्य आणि इतर शिधा सोबत घेतला आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्य शासन मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत मुंबई येथून परत गावी न येण्याचा निर्धार करत समाजबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी या यात्रेत सहभागी झालो आहोत. आता परत येण्यास कितीही दिवस लागले तरी हरकत नाही. आतापर्यंत समाजाचे नुकसान झाले आहे, या महिनाभरात शेतीचे आणि इतर कामांचे काय नुकसान व्हायचे ते होऊ द्या. पण, आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही.

- बाजीराव ससे, बाचेगाव, ता. जिंतूर

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई यात्रेत सहभागी झालो आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई येथून माघारी येणार नाही.

-दिगंबर आंभोरे, रा. सेलगाव, ता. बदनापूर

मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालो आहे. सर्व तयारीशी जात असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मुंबईतच राहणार आहोत. वीस दिवस पुरेल एवढे धन्य सोबत घेतले आहे. जर हे धान्य संपले तर पुन्हा गावाकडून धान्य आणि इतर साहित्य मागवू; पण आता आरक्षणाशिवाय परत येणार नाही.

- मधुकर जाधव, विरेगाव, ता. वसमत

मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही. सोबत भाकरीचे पीठ, चटणी, मीठ, तेल, भाजीपाला घेतला आहे. गावाकडील सर्व कामे उरकून आलो आहोत. त्यामुळे सरकार जोपर्यंत आरक्षण देणार नाही, तोपर्यंत मुंबईत मुक्काम करणार आहोत. गावातून एक पिकअप घेऊन निघालो आहोत.

- भोजराज राखुंडे, रा. आरळ, ता. वसमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेतच लढाई; ठाकरेंच टेंशन वाढणार?

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : इम्तियाज जलील म्हणजे फडणवीसांचे हस्तक!

Latest Maharashtra News Updates Live : के पी पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Zomato: सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका! झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी, कंपनीने सांगितले कारण

Solapur Assembly Election 2024 : सोलापूरात काँग्रेसच्या वाट्याला तीन मतदारसंघ? सर्वांचे लक्ष सोलापूर दक्षिण, मध्यवर...

SCROLL FOR NEXT