Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मराठवाड्यात एसटीच्या चाकांना ब्रेक! संभाजीनगरहून केवळ पुणे मार्गावर सेवा सुरू

उर्वरित सर्व मार्ग बंद झाले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील एसटी बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. एसटीची तोडफोड व जाळपोळीच्या घटना अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत झाल्याने महामंडळाने खबरदारी घेतली असून बस बाहेर न काढण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी आगारप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे काही अपवाद वगळता ही एसटीच्या चाकांना ब्रेक लागला आहे. मराठवाड्यातज्ञआतापर्यंत एकूण आठ बसेस फोडण्यात आल्या असून एक जाळण्यात आली. तर तब्बल चाळीस आगारांतून नियमित होणारी बससेवा काही तुरळक अपवाद वगळता संपूर्ण बंद आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, पैठण, वैजापूर हे सर्व आगार बंद करण्यात आली असून, या सर्व मार्गावर ब सेवा बंद झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनामुळे रविवारी (ता.२९) दुपारनंतर बहुतांश आगार बंद केल्यामुळे वीस लाख रुपयांचा फटका बसला आहे. सध्या मध्यवर्ती बस स्थानकातून केवळ पुणे मार्गावरील बस सेवा सुरू असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.

मराठा आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती संभाजी नगर विभागाच्या चार बस आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या. त्यामुळे खबरदारी म्हणून यावेळी अगोदरच बस सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजी नगर आगाराच्या बसचे कुठेही बसचे अद्यापपर्यंत नुकसान झालेले नाही. एसटी सेवा बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत.

खाजगी वाहतूकदारांनी प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. सध्या अनेक शाळेतील सहामाही परीक्षा सुरू असल्यामुळे ग्रामीण भागातून आगार प्रमुखांना बस सुरू करा, अशी विनंती करणारे फोन शिक्षकांकडून केले जात आहेत. मात्र वरिष्ठांच्या निर्णयामुळे बस सेवा सुरू करता येत नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे.

जालन्यात चार बसवर दगडफेक

जालना जिल्ह्यात रविवारी (ता.२९) चार बसवर दगडफेक झाली. काल दुपारपासून संपूर्ण आगारातील बससेवा बंद आहे. लातूर जिल्ह्यात एकही बस फोडण्यात आली नाही. पण लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा व उदगीर या पाच आगारातील बससेवा काल दुपार पासून बंद आहे. परभणी जिल्ह्यात एकही बस फोडण्यात आली नाही. मात्र परभणी व हिंगोली जिल्ह्यात मिळून ४२५ बसगाड्याच्या दोन हजार ८०० फेऱ्या रद्द केलेल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात दोन बस फोडल्या असून रविवारी दुपारपासून नऊ आगारातून जिल्हांतर्गत व लांब पल्ल्याच्या बसेस बंद केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात एक ही बस फोडण्यात आली नाही. हिंगोली, कळमनुरी व वसमत या तिन्ही आगारातील बसेस बंद आहेत. बीड जिल्ह्यात एक बस जाळण्यात आली तर एक फोडण्यात आली. तर जवळपास सर्व आठ आगार बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT