निफाड : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निधनाचे पडसाद निफाड तालुक्यात उमटले. त्या पार्श्वभूमीवर
मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेत निफाड शहरात कडकडीत बंद पाळला. येथिल शांती नगर चौफुलीवर नाशिक औरंगाबाद महामार्गासह सुरत शिर्डी मार्गावर मराठा तरुणांनी सुमारे तासभर रास्तारोको अंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आला.
सकाळपासूनच निफाड शहरातील वैद्यकीय सेवा वगळतासर्वच्या सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दुकाने बंद असल्याने शहरात शुकशुकाट जाणवला. तसेच सर्व शासकीय कार्यलयात नागरिकांची वर्दळ अतिशय कमी होती. सकाळी 11 च्या दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने येथील शांतीनगर त्रिफुलीवर रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, पिंपळगांव बसवंतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या व इतर घोषणा देऊन आंदोलनस्थळ दणाणून सोडले.
दरम्यान अंदोलन सुरु अंसतांना दोन शासकीय वाहने अंदोलन स्थळावरुन जात असतांना पोलिस आणि तरुणांत शब्दीक चकमक झाली. मात्र जेष्ठांच्या शांततेच्या आव्हानामुले सामंजस्याची भुमिका घेत नंतर पुन्हा रास्तारोको सुरु करण्यात आला. याप्रसंगी अनिल कुंदे, बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, सुधीर कराड यांची भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन सर्कल ऑफिसर खैरे यांना दिले. याप्रसंगी प्रचंड संख्येने आंदोलक उपस्थित होते. निफाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. बससेवा व खाजगी वाहतूक सेवा बंद असल्याने निफाड बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता.
आम्हाला कायदा सुव्यवस्था हातात घ्यायचा नाही अंदोलकांना प्रशासनाने त्रास देवु नये आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठीच आज सकल मराठा समाजाचे अंदोलन आहे. शासनाने आता आमचा अंत पाहु नये.
-अनिल कुंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.