मराठवाडा

Marathwada: वनविभागाची मोठी कारवाई, अवैध लाकुड वाहतुक करणारा ट्रक पकडला!

Forest Department: लाकुड वाहतूक परवाना नसल्याने सदरचे वाहन मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bidkin News: येथील बिडकिन ते शेकटा रोडवर गस्त घालत असताना वनविभागाच्या वतीने एका अवैध लाकुड वाहतुक करणारे ट्रकवर कार्यवाही करण्यात आल्याची घटना ता. (०६) मंगळवारी उशिरा झाली आहे.

वनपरीक्षेत्र अधिकारी स्ट्राइक फोर्स छत्रपती संभाजीनगर एस. जी. नांदवटे व त्यांच्या अधिनीस्त कर्मचारी बिडकीन ते गिधाडा शेकटा रोडवर रात्रगस्त करीत असताना एक वाहन क्र. KA- 56 1454 हे अवैध लाकुड वाहतूक करीत असताना पकडले सदर वाहन चालक आदम पटेल याच्या कडे कोणत्याही प्रकारचा लाकुड वाहतूक परवाना नसल्याने सदरचे वाहन मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

वन गुन्हा जारी करण्यात आला तसेच सदरचे वाहन चालक आरोपी नामे आदम पटेल दस्तागीर पटेल,वय.४० वर्षे ,राहणार रोला,तालुका बसवकल्याण, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 व 42 आणि 52 महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे नियम-3, महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम-31 (1) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील वाहन हे पटेल साँ मिल बिडकीन या ठिकाणी पुढील चौकशी कामी ठेवण्यात आले आहे अशी माहिती कार्यवाही अधिकारी प्रविण कांबळे यांनी दिली आहे.

सदरची कार्यवाही वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर हनुमंत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली तसेच उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर सुर्यकांत मंकावार व विभागीय वन अधिकारी (नियोजन) छत्रपती संभाजी नगर टेमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी स्ट्राइक फोर्स छत्रपती संभाजीनगर एस.जी. नांदवटे, वनपाल मनोज कुमावत, वनपाल प्रवीण कांबळे, वनरक्षक माधव तोटेवाड, वनरक्षक अनिल जाधव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT