Latest Marathi News: कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंटूर फाटा येथील एका गोदामावर नायगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी सकाळी धाड मारली असता शालेय पोषण आहाराच्या पाँकीटासह मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा साठा होता. त्यात तुरदाळ,चनादाळ, सोयाबीन, तांदूळ अशा विविध धान्याच्या २ हजार ८०० बँगा आढळून आल्या. त्याचबरोबर टेंपो व अटोरिक्षामध्येही धान्य आढळून आल्याने एकच खळबळ तर उडालीच आहे.
नायगाव पोलिसांनी रात्री गोदाम शिल केले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली असल्याने कुंटूर पोलीसांचे पितळ उघडे पडले आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुटूर फाटा येथे रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी यांचे ताज ट्रेडर्स असून या ट्रेडर्सच्या नावाखाली सर्रास राशनचे धान्य खरेदी करण्याचा उद्योग सुरु आहे. या अवैध प्रकाराला कुंटूर पोलीसांचे अभय असल्याने आमचे कुणीच काहीही वाकडे करु शकत नाही या अविर्भावात तो वावरत होता.
या प्रकरणी कुंटूर पोलीसाकडे अनेकांनी तक्रारी केल्या पण त्या तक्रारदारांना कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील हे अरेरावीचे भाषा वापरत होते. काल शनिवारी नायगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी सुध्दा त्यांनी हुज्जत घातली होती.
कुंटूर फाटा येथील या उद्योगाची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर कारवाई करण्याची आदेश नायगाव पोलिसांना देण्यात आले होते. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी शनिवारी सकाळी फौज फाट्यासह जावून गोदामावर धाड मारली.
रजवी नवाज हुसेन अब्दुल बारी याच्या कुंटूर फाटा येथील गोदामामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रावर गरोदर माता आणि लहान मुलांना वाटप करण्यात येणाऱ्या घरपोच आहाराच्या एनर्जी डेन्स तूर डाळ खिचडी प्रीमिक्सचे २५ पाकीट, एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्सचे २० पाकीट, मल्टीमिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन प्रीमिक्सचे १०० पाकीट असे एकूण १४५ पाकिटे आढळली.
रजवीच्या गोदामाची पाहणी केली असता १ हजार बॅग तूर, ५०० बॅग चना, ८०० बॅग अरकळ, ५०० बॅग सोयाबीन अशा वेगवेगळ्या धान्याच्या २ हजार ८०० बॅग आढळून आल्या. त्याचबरोबर एम एच २६, सी एच ०८५१, एम एच २२ ए एन ३११३ हे दोन टेंपो व एम एच २६ टि ६६८१ या क्रमांकाच्या अटोमध्येही धान्य होते. हे सर्व धान्य पोलिसांनी जप्त केले असून गोदाम सिल करण्यात आले आहे.
नायगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोफत वाटप करण्यात येणाऱ्या आहाराचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये तालुकास्तरापासून जिल्हास्तरांपर्यंत अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा आता पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.