औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २७) दिवसभरात चार हजार ६६९ कोरोना रुग्णांची भर पडली तर ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात पुन्हा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. जालना आणि लातूर जिल्ह्यातही चारशेपेक्षा अधिक तर बीड जिल्ह्यात पावणेचारशे जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ६१५ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर २८ जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात एक हजार ७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याचबरोबर तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल २४६ कोरोनाबाधित आढळले.
तसेच आठ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ११६ जणांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या एक हजार ३८२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात नवीन ११३ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर ११५ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.बीड जिल्ह्यात शनिवारी ३७५ रुग्ण आढळले. दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. प्रसाराचा वेग साधारण १४ टक्क्यांपर्यंत होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात आणखी १५० खाटा वाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या २४ हजार १९१ झाली आहे.
आत्तापर्यंत २१ हजार ९७९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या १५९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यापैकी ५९३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ६१८ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, सध्या जिल्हा रुग्णालयात चारशे खाटा कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. आता जिल्हा रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहाच्या इमारतीसह नेत्र विभागातही कोविड रुग्णांसाठी सोय केली जाणार आहे. या ठिकाणी दीडशे खाटा वाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांचे कोविड उपचारासाठी अधिग्रहण करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात ४८३ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात मृत्यूची नोंद नाही. दिवसभरात २२४ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर ४४० नवे रुग्ण आढळले.
Edited - Ganesh Pitekar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.