मराठवाडा

Marathwada: वाळूमाफियांसह जमावाचा पोलीसांवर हल्ला, गेवराईतील तलवाडा येथे भयंकर प्रकार

सकाळ वृत्तसेवा

----

भास्कर सोळंके

Beed: चोरीच्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन पोलीस ठाण्यात नेत असतानाच वाळूमाफियांसह जमलेल्या जमावाने पोलिसांना रोखत त्यांच्या अंगावर धावून मारहाण करण्याचा प्रकार बुधवारी गेवराईतील तलवाडा येथे घडला.

वाळू माफीयांची गेवराई तालुक्यात मुजोरी वाढत चाललेली आहे.बुधवारी(ता ७)दुपारी तलवाडा येथील गणेश नगर भागातुन वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलवाडा पोलीस ठाण्याचे शिपाई विठ्ठल चव्हाण यांनी पकडले.सदर ट्रॅक्टर ठाण्याकडे नेत असतानाच येथील काही नागरिकांचा जमाव होत जमावातील एकाला ट्रॅक्टरला अडवे झोपवले.सरकारी कामात अडथळा निर्माण करत वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पळवून नेले.

यावरुन विठ्ठल चव्हाण यांच्या तक्रारीवरून फुलाबाई मस्के,मुसा शिंदे,सुनिल शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,चंदू मस्के, सर्जेराव मस्के, विशाल(पिंट्या) कुऱ्हाडे,शिवदास(काल्या)शिंदे,मुखारी शिंदे,अमोल मस्के,ईश्वर मस्के,कैलास पवार, दशरथ मस्के,मुसा मस्के,देवराव मस्के,शिवा पवार, पिंटू शिंदे,राजा पवार, कल्याण पवार,सुनिल मस्के,संजय पवार, कोंडिबा मस्के रा.सर्व गणेश नगर यांच्यासह इतर १० महिला व पुरुष यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार महेश जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT