marathwada sakal
मराठवाडा

नरसापूरात चक्क बैलगाडीत मृतदेह टाकून केली नदी पार

सदर व्यक्तीचा मृतदेह बैलगाडीत टाकून गावाकडे न्यावा लागला.

विलास शिंदे

सेलू : नरसापुर ( ता.सेलू ) येथे गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत पूल उभारला गेला नाही.या पावसाळ्यात ग्रामस्थांना अनेक जीव घेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी (ता.१७) रोजी येथील एका ग्रामस्थाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. झालेल्या पावसाने करपरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शनिवारी ( ता.१८ ) रोजी औरंगाबाद येथून अम्बुलंसने मृतदेह आणण्यात आला. सदर व्यक्तीचा मृतदेह बैलगाडीत टाकून गावाकडे न्यावा लागला.

नरसापूर येथिल ग्रामस्थांना अशा अनेक जीवघेण्या संकटाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. ऑगस्ट महिन्यात देखील एक व्यक्ती पूर ओलांडताना वाहून गेला होता. गतवर्षी अशीच एक घटना (ता.११) ऑक्टोबर २०२० रोजी घडली होती. एका आठ वर्षाच्या मुलाला सर्पदंश झाला. त्यावेळी या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने करपरा नदीला पूर आला होता.

सर्पदंश झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात येण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना व ग्रामस्थांना पुराचा सामना करावा लागला. गावातील दहा ते पंधरा तरुणांनी, नागरीकांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुरातून दोरीच्या सहाय्याने नदी ओलांडून त्या मुलास जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. तो सुखरूप घरी आला. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत नरसापुर गावाकडे जाणाऱ्या करपरा नदीवर पुल नसल्याने अशा अनेक जीव घेण्या प्रसंगाला नागरीकांना सामोरे जावे लागते. ग्रामस्थांनी नदीवर पुल उभारणीसाठी मागणी केली आहे. मात्र अद्यापही याकडे राजकिय नेते अथवा प्रशासन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT