मराठवाडा

Marathwada Rain Update: पळाशी तांड्यात वीज कोसळून दोन जनावरे दगावली

सकाळ डिजिटल टीम

Latest Saigaon News: बनोटी मंडळातील झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे उप्पलखेडा गावात एक घर हवेत पत्रे उडून कोसळले, तर पळाशी तांड्यात वीज कोसळून दोन गायी दगावल्याची घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंडळ अधिकारी लक्ष्मण जाधव, तलाठी संतोष राऊत, तुषार नागपुरे यांच्या पथकांनी दोन्ही घटनांचा पंचनामा केला.

     बनोटी मंडळातील चाळीस गावांना बुधवारी ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा बसला. रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, वादळी वाऱ्यात उप्पलखेडा येथील विष्णू पवार यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून घर कोसळले.

त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रात्र उघड्यावर काढावी लागली. दुसऱ्या घटनेत पळाशी तांड्यात वीज कोसळून शेतकरी रंजित देवचंद राठोड यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन गायी जागीच दगावल्या. घटनास्थळी तलाठी तुषार नागपुरे यांनी तातडीने भेट दिली व रात्री उशिरा सोयगाव तहसील कार्यालयात अहवाल पाठविला. दरम्यान, उप्पलखेडा येथील घराचे नुकसान झालेले आहे. संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांनी दिली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.

तोंडाशी आलेला घास हिरावला तोंडाशी आलेला घास हिरावला

जायकवाडी ः पैठण शहरात बुधवारी (ता.२५) रात्री आठच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली होती. रस्त्यावरून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.पावसामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या आमच्या तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावल्याचे शेतकरी रमेश ढवळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT