नांदेड - कोरोना व्हायरसच्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या चाचणीसाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सुसज्ज प्रयोगशाळेत प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच मराठवाड्यात नांदेडबरोबरच औरंगाबाद आणि लातूरला देखील ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ३१) दिली.
नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय बेळगे यांच्यासह इंडियन मेडीकल असोसिएशनच्या नांदेड शाखेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. त्यानंतर श्री. चव्हाण हे पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा - अशोक चव्हाण, अमर राजूरकरांनी दिला पन्नास लाखाचा निधी
‘आयसीएमआर’ची मान्यता लवकरच अपेक्षित
सध्या कोरोनाच्या संदर्भातील चाचणीसाठी पुण्याला जावे लागत असून त्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भातील चाचणी करण्यासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सुसज्ज प्रयोगशाळेत सुविधा उपलब्ध करुन देता येईल. त्यासाठी इंडियन कौन्सिल ॲफ मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) ची मान्यता लवकरच अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात औरंगाबाद व लातूरला देखील ही सुविधा उपलब्ध असेल. त्यासाठी केंद्राकडून आयसीएमआरची रितसर मान्यता मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी देखील बोलणे झाले असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी जे जे शक्य आहे ते करण्यासाठी सरकारच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली. नांदेड शहर आणि जिल्ह्यातही करण्यात आलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री या नात्याने मी आज आढावा घेतला असून कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना करावयाच्या असतील त्या कराव्यात तसेच वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठीही संबंधित विभाग आणि अधिकारी यांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशा सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचलेच पाहिजे - Video - नांदेडकर अजूनही अनभिज्ञच...कशाबाबत ते वाचाच....
खासगी डॉक्टरांची सेवा देण्याची तयारी
कोरोनाच्या आजारावरील लढ्याच्या विरोधात आता खासगी डॉक्टरही पुढे आले असून त्यांनी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. या बाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नांदेड शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांसोबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन, आमदार अमर राजूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी तसेच आयएमएचे नांदेडचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, सचिव डॉ. अवेस अब्बासी, सदस्य डॉ. संजय कदम, डॉ. मानकर डॉ. दीपक गोरे, डॉ. उमेश कोळेकर, डॉ. राम बहिरवाड, डॉ. शशी गायकवाड, डॉ. खडकीकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने काही प्रश्नांवर चर्चा झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.