photo 
मराठवाडा

विवाहितेने किडनी देवून भावाचे वाचविले प्राण

मारोती काळे

कुरुंदा(जि. हिंगोली): कुरुंदा (ता. वसमत) येथील एका विवाहितेने तीन वर्षांपासून किडनीच्या आजाराने अंथरूणावर खिळून असलेल्या मोठ्या भावाला किडनी देवून त्याचे प्राण वाचविले आहेत. विवाहितेच्या पतीनेही मोठेपणा दाखवत नात्याला घट्ट केले. भावाला जीवदान देणाऱ्या दांपत्याचा येथे नरहर कुरुंदकर विद्यालयात नुकताच सत्‍कार करण्यात आला.
 
बामणी (ता. अर्धापूर जि. नांदेड) येथील श्याम राजाराम कदम (वय ३५) यांचा अंगातील ताप काही वर्षांपासून कमी होत नव्हता. त्यामुळे उपचारासाठी त्‍यांना दवाखान्यात दाखल केले होते. त्‍यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी त्‍यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सांगितले. तीन वर्ष या आजाराने अंथरूणावर खिळून होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. त्‍यांना होणाऱ्या वेदना कुटुंबीयांना पाहवत नव्हत्या.

आईची किडनी जुळेना

 त्यामुळे श्याम कदम यांना किडनी देण्यासाठी त्‍यांच्या आईने पुढाकार घेतला. किडनी प्रत्यारोपणासाठी दवाखान्यात पूर्ण तपासण्या केल्या. मात्र त्‍यांची किडनी श्याम कदम यांना जुळत नव्हती. 
त्यामुळे कुटुंबीयांच्या चिंतेच भर पडली. श्याम कदम यांची लहान बहिण शालिनी संतोष दळवी कुरुंदा (ता. वसमत) येथे आहे. भावाची किडनी निकामी झाल्याची माहिती शालिनी यांना समजली. आईची किडनी जुळत नसल्याने भावाचे प्राण धोक्यात आहेत. 

बहिण आली धावून

अशा परिस्थितीत आपली किडनी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पती संतोष दळवी यांनाही या बाबत माहिती दिली. त्‍यांनी व त्‍यांच्या कुटुंबीयांनीही उदारपणा दाखवत किडनी देण्यास समर्थता दर्शनिली. त्‍यानंतर नांदेड येथील सिग्मा हॉस्‍पीटल येथे त्‍यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. त्यामुळे भावाच्या मदतीला बहिण धावून आल्याने भावाचे प्राण वाचले. समाजात वेगळा आदर्शन निर्माण केला. या घटनेमुळे नात्याला आणखी घट्ट केले.  भाऊ श्याम कदम व बहिण शालिनी दळवी हे दोघेही सर्वसामान्याप्रमाणे निरोगी आयुष्य जगत आहेत. 

नरहर कुरुंदकर विद्यालयात सत्कार

क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नरहर कुरुंदकर विद्यालयात साजरी करण्यात आली. या वेळी भावाला किडनी देवून जीवदान देणाऱ्या शालिनी दळवी व त्यांचा पती संतोष दळवी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्मिला कदम; तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्री. देलमाडे, श्रीमती चामणीकर, श्रीमती इंगोले, श्रीमती लोखंडे, श्रीमती पडोळे, श्रीमती यमलवाड आदींची उपस्‍थिती होती. अवयव दानाची चळवळ समाजात रुजावी, तिचा प्रसार व प्रचार व्हावा, समज, गैरसमज दूर व्हावेत असा संदेश या सत्कार कार्यक्रमातून देण्यात आला. तसेच शिक्षणाने माणसात माणुसकी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा शालिनी संतोष दळवी यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT