Latur Municipal Corporation News sakal
मराठवाडा

लातूर महापालिकेत सदस्य वाढले, आता हद्दवाढीकडे लक्ष

अकरा सदस्य वाढले

सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य शासनाची धरसोड वृत्ती सातत्याने समोर येत आहे. युती शासनाची चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून एक सदस्य प्रभाग रचनेचा आदेश काढण्यात आला. त्याला विरोध झाल्यानंतर तीन सदस्य प्रभाग रचनेचा आदेश काढला गेला. त्याला काही दिवस होत नाहीत तोच प्रत्येक शहरातील लोकसंख्या गेल्या दहा वर्षात वाढल्याचे शासनाचे लक्षात आले. वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून शासनाने आता महापालिकेच्या सदस्यसंख्येत वाढ केली आहे. यानुसार लातूर महापालिकेत अकरा सदस्य वाढले असून एकूण संख्या ८१ वर गेली आहे. आता हद्दवाढीकडे लक्ष लागले असून ती जर मंजूर झाली तर आणखी सदस्य वाढण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय बुधवारी (ता. २७) घेतला. शहराची वाढलेली हद्दी, लोकसंख्येत १५ ते २० टक्क्यांनी झालेली वाढ व लोकांच्या समस्या लक्षात घेऊन नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे लातूर महापालिकेची सदस्य संख्या ११ ने वाढणार आहे. सध्या महापालिकेची सदस्या संख्या ७० असून ती ८१ होणार आहे.

लातूर महापालिकेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. खाडगाव, वासनगाव, आर्वी, बसवंतपूर, वरवंटीसह लातूर शिवारातील वस्त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. ता. १३ नोव्हेंबरपर्यंत त्यावर हरकतीही मागवण्यात आल्या आहेत. या हरकती आल्यानंतर त्यावर शासनाने ता. २६ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेऊन हा हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर केला तर सदस्य संख्येत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे आता हद्दवाढीकडे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाच्या महापालिकेच्या सदस्यांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. लातूर महापालिकेत आता २३ ऐवजी २७ प्रभाग होतील. प्रभाग लहान होतील. नगरसेवकांची संख्या वाढल्याने कामे सुलभतेने होण्यास मदत होईल. शहराच्या विकासात अधिक व्यक्तींचा सहभाग गरजेचा असतो. आता नगरसेवक वाढल्याने त्या पद्धतीने नियोजन करणे सोपे जाईल.

-विक्रांत गोजमगुंडे, महापौर, काँग्रेस, महापालिका, लातूर

राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे येणारी निवडणुकीची प्रक्रिया अधिक किचकट होणार आहे. मूलतः लातूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. निवडणुकीत हद्दवाढीचा भाग गृहित धरला जाणार की नाही याची संदिग्धता आहे. महापालिका अधिनियमात नगरसेवक संख्येचा निकष नमूद आहे. त्यामुळे आता अकरा सदस्य वाढले असले तरी अधिनियमाच्या निकषानुसार यात बदल होवू शकतो. सध्या तरी कोणतेही चित्र स्पष्ट होत नाही. सर्वच बाबी गुलदस्त्यातच आहेत. निर्णय घेताना शासनाने याचे भान ठेवलेले दिसत नाही. निवडणूक प्रक्रिया किचकट होणार आहे.

-ॲड. शैलेश गोजमगुंडे, सभागृह नेता, भाजप, महापालिका, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT