Parbhani News 
मराठवाडा

लाख मोलाची काकडी ‘त्यांना’ लखपती बनविणार

रंगनाथ गडदे

चारठाणा : जिद्द आणि नाविन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश मिळते. त्यातही शेतीक्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते मिळवता येते, हे चारठाणा येथील प्रयोगशील शेतकरी भारत तोडकर यांनी दाखवून दिले आहे. त्याचा हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

पारंपरिक आणि अति खर्चिक सोयाबीन, कापूस पिकाला फाटा देऊन नवनवीन पिकांची लागवड केल्यावरदेखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो, याचे उत्तम उदाहरण जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील भारत तोडकर या प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या दहा गुंठ्यांत काकडीचे पीक घेवून दाखवून दिले आहे. काकडी उत्पादनातून त्यांना दोन लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन होणार असून, लाख मोलाची काकडी त्यांना लखपती बनविणार आहे. त्यांची ही वेगळी वाट परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. 

असा केला प्रयत्न
भारत तोडकर हे किराणा व्यापारी आहेत. त्यांचे वडील हे शेतीचा कारभार पाहत होते. ते वयोवृद्ध झाल्याने शेतकरी भारत यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांना हळूहळू शेतीची आवड निर्माण होऊ लागली. त्यांनी मागील पाच वर्षांपासून शेती कसण्यास सुरवात केली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना गतवर्षी मल्चिंग पेपरचा वापर करून वीस गुंठ्यांत शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली. त्यातून त्यांना ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतामध्ये आणखी विविध प्रयोग करावयाचे ठरविले आणि या वेळी ऑक्टोबरमध्ये नवीन रिजवान जातीची काकडीची पाॅलीहाऊसमध्ये दहा गुंठे मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड केली. मल्चिंगमुळे खुरपणीचा खर्च वाचला, तसेच पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाल्याने पाण्याची बचत झाली. योग्य नियोजन केल्याने अवघ्या दहा गुंठ्यांत काकडीपासून सुमारे दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. सध्या काकडी औरंगाबाद येथील जाधव मंडईत बाजारात विक्रीस नेत असून आणखी तीन टन काकडी निघणे अपेक्षित असल्याचे तोडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दोन लाखांचा नफा
मागिल वर्षी ८० हजार रुपये उत्पन्न निघाले. कापूस, सोयाबीन पेक्षा इतर पिके जास्तीत जास्त फायद्याची ठरू शकतात, हे काकडीच्या प्रयोगातून पटल्यामुळेच याहीवर्षी काकडीचा प्रयोग केला. काकडीचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यासाठी खर्च तीस हजार रुपये झाला. खर्च वजा जाता काकडीतून दहा गुंठ्यात दोन लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे.
- भारत तोडकर (प्रयोगशील शेतकरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

Assembly Election Voting 2024 : मतदान केंद्रावर राडा नडला! मतदान संपण्याआधीच उमेदवाराला पोलिसांनी केली अटक

Jharkhand Exit Poll: झारखंडमध्ये भाजप आघाडीला बहुमत; काय सांगताएत एक्झिट पोल?

Paithan Assembly Constituency Voting : आडुळ येथे शांततेत मतदान राञी उशीरा पर्यंत रांगा...

SCROLL FOR NEXT