लातूर : मुलगी बेपत्ता झाल्यानंतर अनेक पालक समाजात बदनामीच्या भीतीने पोलिस प्रशासनाकडे लगेच तक्रार वा माहिती देण्यास धजावत नसत. परिणामी अनेकदा वेळ निघून जाई. अशी मुलींचा शोध घेणे आव्हानात्मक बनत असे. आता मात्र पालकांमध्ये याबाबत जागरूकता येत आहे. पोलिसांना वेळीच माहिती दिली जात असल्याने पुढील अनर्थही टळत आहेत. दरम्यान, अशाच एका घटनेत वेळेवर माहिती मिळाल्याने औसा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांमध्ये बेपत्ता मुलीचा शोध लावला आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मागील काही महिन्यांपासून बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (एएचटीयू) यश येत आहे. या स्थितीत कक्षाकडून घरातून बेपत्ता झालेल्या मुलींना त्या दूर जाण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबांकडे सुपूर्द करण्यात येत आहे. औराद शहाजानी येथील दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना पोलिसांनी काही दिवसापूर्वीच चोवीस तासांत घरी आणले. त्यामुळे मुलगी बेपत्ता होताच त्याची माहिती पालकांकडून तातडीने पोलिसांना देण्यात येत आहे. पूर्वी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालक किंवा नातेवाइकांकडून बदनामीच्या भीतीने पोलिसांना माहिती दिली जात नव्हती.
परिणामी अशा मुलींचा शोध घेणे आव्हानात्मक बनत होते. आता पोलिसांकडून तातडीने शोध होत असल्याने मुलगी बेपत्ता होताच पालक-नातेवाइकांकडून याबाबत तातडीने माहिती दिली जात आहे. अशाच एका घटनेत औसा पोलिस ठाण्यात ता.३० जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध सुरू केला. सायबर सेलकडूनही पोलिसांना मुलीच्या शोधासाठी मार्गदर्शन मिळत होते. विविध पथकांकडून ठिकठिकाणी भेटी देत शोध घेतला जात होता.
मात्र मुलगी सापडत नव्हती. त्यातच पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड व त्यांच्या पथकाने गोपनीय व सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण केले. या मुलीचा शोध घेतला. ही मुलगी लातूर ते उमरगा बसने प्रवास करीत असताना मिळून आली. चोवीस तासात तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.