नांदेड : नांदेड (उत्तर) चे आमदार बालाजी कल्याणकर हे बुधवारी (ता. आठ) दुपारी आनंदनगर परिसरातून जात असतांना बँक आॅफ बडोदासमोर भर उन्हात महिलांची रांग दिसली. यावेळी आमदार कल्याणकर यांनी बँक व्यवस्थापक (मॅनेजर) यांना खातेदारांच्या गैरसोयीबद्दल चांगलेच सुनावले.
प्रखर उन्हामध्ये महिला रांगेत उभ्या तळपत होत्या. हे चीत्र आमदार बालाजी कल्याणकर यांनी पाहिले. लगेच त्यांनी आपली गाडी थांबवत बँकेसमोरील महिला व नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी रांगेतील अनेकांनी आम्ही सकाळपासून तळपत्या उन्हात पैसे काढण्यासाठी थांबलो आहे. अनेकांनी तर आमचा क्रमांक आला की बँकेचे कर्मचारी लंचच्या नावाखाली शटर बंद करतात. शासनाने दिलेले पैसे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे वेळेत मिळत नसल्याचे त्यांनी आमदार कल्याणकर यांना सांगितले.
हेही वाचा - सिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा
बँक अधिकाऱ्याला सुनावले
यावेळी आमदार कल्याणकर यांनी बँक व्यवस्थापक श्री. सिंग यांना बाहेर बोलावून त्यांना खातेदारांसमोरच सुनावले. तसेच रांगेतील नागरिकांचे काय हाल होत आहेत हे दाखवले. त्याचबरोबर कोरोनाच्या सोशल डिस्टन्सींगच्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यासह उन्हापासून रक्षण करण्यासाठी वेळापत्रकात बदल करावा किंवा टोकन देण्यात यावे याबद्दल बँक मॅनेजर सिंग यांनी तात्काळ उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.
लॉयन्स क्लब मिडटाऊनच्यावतीने ६०० कीटचे वाटप
नांदेड : लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रशासनाच्या सहकार्याने गरजूंच्या वस्तीत घरापर्यंत कामगार, मजुरांच्या पालावर जाऊन लॉयन्स क्लब मिडटाऊनच्यावतीने जीवनावश्यक असलेल्या पाच किलो गहू पीठ, पाच किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, एक किलो मीठ, एक किलो तेल पाकीट, मिर्ची पावडर अशा वस्तू असलेल्या तीन लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ६०० किटचे वाटप करण्यात आले.
येथे क्लिक करा - जुन्या नांदेडात पाण्याचा ठणठणाट
६०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले
परप्रांतीय, गरजू तसेच पालावर राहणाऱ्या कामगार, रेशन कार्ड नसलेले व्यक्ती यांना शहरातील श्रावस्तीनगर, जवाहरनगर आदी भागात तसेच ग्रामीण भागातील वानेगाव स्टेशन, धनेगाव, वाजेगाव आदी भागातील ६०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. लॉयन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष योगेशकुमार जैस्वाल, सचिव अमरसिंग चौहाण, कोषाध्यक्ष नितीन लाठकर, प्रकल्प संचालक प्रेमकुमार फेरवाणी यांच्या संकल्पनेतून ६०० कुटुंबांचा किमान आठवडाभर तरी प्रश्न मिटावा यासाठी नियोजन करून अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.