Heavy rain in Dhanora Ghansawangi esakal
मराठवाडा

Monsoon Update : धानोरा, घनसावंगी परिसरात जोरदार पाऊस; शेती झाली जलमय, काही मार्गावरील वाहतूक बंद

सकाळ डिजिटल टीम

गेल्या चार-पाच दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. रात्रभर पाऊस असल्याने शेतात पाणीच पाणी झाले होते.

धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात सोमवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतात पाणीच पाणी जमा झाले होते. सर्व शेती जलमय झाली होती. परिसरातील मांजरा नदी आणि नाले खळखळून वाहिले. सकाळी तटबोरगाव येथील ओढ्याला पाणी आल्याने धानोरा तट-बोरगाव वाहतूक बंद होती.

धानोरा खुर्द परिसरातील आपेगाव, तटबोरगाव, कोपरा, अंजनपूर, सोमनाथ, बोरगाव, देवळा, पाटोदा, ममदापूर, अकोला, तडोळा आधी गावांत संध्याकाळी आठ वाजता पाऊस सुरू झाला होता. संध्याकाळी अकरा वाजता मोठ्या पावसाला सुरुवात झाली.

गेल्या चार-पाच दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. रात्रभर पाऊस असल्याने शेतात पाणीच पाणी झाले होते. छोटे ओढे-नाले, मांजरा नदी सकाळी खळखळून वाहत होती. या मोठ्या पावसाने शेतकरी समाधानी झाले आहेत. आपेगाव-इस्थळ आणि धानोरा तटबोरगाव रस्त्यावरील ओढ्याला पाणी आल्याने काही वेळ वाहतूक बंद होती. परिसरात मोठा पाऊस झाल्याने मांजरा नदी खळखळून वाहत असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी केलेली आहे.

घनसावंगीत जोरदार पाऊस

घनसावंगी : घनसावंगी शहर व तालुक्यात सोमवार (ता. दहा) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक सिंचन प्रकल्पातही पाण्याचा साठा वाढला असून मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे विहिरीची पाणी पातळी वाढल्याचे दिसून येत असून दुसरीकडे शेतकरी या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामात लागलेला आहे.

तर, ढाकेफळ ता. घनसावंगी शिवारात ढगफुटीच्या पावसाने शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील दोन ते तीन शेतकऱ्यांनी खरिपाची कापसांची लागवड केली. या पावसामुळे बियाणे वाहून गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतातील लागवड केलेली बियाणे वाहून गेली. तसेच शेतातील अनेक शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचेही नुकसान झाले.

Heavy rain in Dhanora Ghansawangi

ढाकेफळ येथे पहिल्याच पावसात खरिपांच्या पिकाच्या पेरणीच्या बियाण्यांसह जमीन ही खरडून गेली. या नुकसानीची प्रशासनाने पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी.

-भागवत गाढवे , शेतकरी ढाकेफळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT