परभणी : महागाई, बेरोजगारी, खासगीकरण आदी प्रश्नांवर बुधवारी (ता. आठ) पुकारलेल्या देशव्यापी संपात शासकीय रुग्णालयातील कार्यालयीन कर्मचारी, परिचारिका, वर्ग चारचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पाटबंधारे, आयटीआय आदी कार्यालयांतील कर्मचारी व बाजार समितीमधील कामगार आदींनी सहभाग घेतला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी धरणे आंदोलन केले.
देशभरात महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची समस्या, कामगार कायद्यात भांडवलदार धार्जीने धोरण, खासगीकरण, कंत्राटदारीकरणाच अतिरेक अशा जनता विरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशात कामगार, कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला होता. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातदेखील मोठा प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्हा गट क महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, सरचिटणीस विजय मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या संपात जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी, वर्ग चारचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्यामुळे रुग्णालयीन सेवेवर परिणाम झाला. रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अस्थायी स्वरूपाच्या परिचारिकांची नियुक्ती केली होती. तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, महागाई भत्याची थकबाकी द्यावी, पाच दिवसांचा अठवडा करणे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे अशा मागण्या कर्मचारी संघटनेच्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर परभणी शाखेचे अध्यक्ष मंगेश जोशी, सचिव पी. सी. सिरस यांची स्वाक्षरी आहे.
हेही वाचा व पहा - Video : पोलिस उभारताहेत पेट्रोलपंप...!
आयटक प्रणित संघटनांचे धरणे
आयटक प्रणित अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेविकांना तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रताही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन द्यावे, या कर्माचाऱ्यांना मानधनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या बाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर ॲड. माधुरी क्षीरसागर, ज्योती कुलकर्णी, सीमा देशमुख, अर्चना फड, अर्चना कुलकर्णी, ताहेरा बेगम, राजर्श्री गाढे, रासवे, संगीता राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी शालेय पोषण आहार कामगार, हमाल माथाडी कामगार संघटनांनीदेखील सहभाग घेतला. रोजगार निर्मीतीसाठी ठोस पावले उचलून बेरोजगारी दूर करावी, कामगार कायद्यातील बदल मागे घ्यावे, कष्टकरी, कामगार यांना सर्वच क्षेत्रात किमान २१ हजार रुपये वेतन लागू करावे, अशा विविध मागण्यादेखील कामगारांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - विटेकर कुटुंबासाठी जिल्हा परिषद ठरली ‘लकी’!
कामगारांचा संपात सहभाग
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी - विक्री ठप्प झाली होती. दुकाने आणि अन्य ठिकाणांवरचे कामगार संपात सहभागी झाल्याने बाजार समितीमधील आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा हमाल माथाडी कामगार युनियनने धरणे आंदोलन केले. कामगारांना किमान वेतन २१ हजार रुपये मिळाले पाहिजे, सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण रद्द करावे, कंत्राटी पद्धत बंद करावी व त्यांना सेवेत कायम करावे, माथाडी बोर्डाची काटेकोर अंमलबजावणी करावी, हमाल माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवावी, कापसावरील लेव्ही माथाडी मंडळात जमा करावी, परभणी बाजार समितीमधील मापाड्यांची पदे भरावीत आदी मागण्यांसाठी संपात सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.