MP Kalyan Kale: sakal
मराठवाडा

MP Kalyan Kale: सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडणार, डॉ.कल्याण काळेंनी दिली मतदारांना ग्वाही

Loksabha 2024 : बाबरा येथे कार्यकर्त्याच्या मेळाव्यात बोलताना खासदार डॉ. कल्याण काळे बोलत होते

नवनाथ इधाटे पाटील

Sambhaji Nagar: लोकांची सेवा करण्यासाठी लोकशाहीचे मंदीर असलेल्या संसदेत तुम्ही मला पाठवले तेव्हा त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतीमालाचे भाव, पिक विमा, मतदार संघातील सर्वसामण्यांचे प्रश्न लोकसभेच्या सभागृहात मांडणार असल्याचे मत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवारी (ता.१७) व्यक्त केले.

फुलंब्री तालुक्यातील बाबरा जिल्हा परीषद सर्कल मधील नायगाव, लालवन, निधोना, पाडळी, वावना, सोनारी, बाबरा, हिवरा, चिंचोली, कान्हेगाव, बोधेगाव खुर्द, बोधेगाव बुद्रुक, विरमगाव, ममनाबाद, नायगव्हाण, आळंद, उमरावती, जातवा, वडोदवाडी आदि गावांना भेटी व आभार दौऱ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडेे, तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, युवकचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर, माजी जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख सोमनाथ करपे, संतोष मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना खासदार डॉ.कल्याण काळे म्हणाले की, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या सरकारने लाडकी बहीण योजना काढली हे लबाडाच आवतन असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.

याप्रसंगी बाबुराव डकले, पुंडलिक जंगले, राजेंद्र चव्हाण, रज्जाक शेख, सदाशिव विटेकर, आजीनाथ सोनवणे, आजीनाथ पायगव्हाण, द्वारकादास काकडे, अंबादास गायके, रामेश्वर गाडेकर आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT