politics esakal
मराठवाडा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सोनवणेंच्या कन्या केजमध्ये पराभूत

केज नगर पंचायतीची निवडणुक रंगतदार झाली.

सकाळ वृत्तसेवा

बीड : नगर पंचायत निवडणुकीच्या निकालात बुधवारी (ता. १९) जिल्ह्यात मातब्बरांना धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा सोनवणे यांना पराभव पत्करावा लागला. जनविकास आघाडीच्या आशाबाई कराड जायंट किलर ठरल्या.

केज नगर पंचायतीची निवडणुक रंगतदार झाली. भाजपच्या आमदार नमिता मुंदडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. तरीही या नगर पंचायत निवडणुकीपासून भाजप चार हात दुर होते. मात्र, हारुण इनामदार यांच्या नेतृत्वाखालील जनविकास आघाडीला भाजपनेते रमेश आडसकर यांनी पाठबळ दिले. दरम्यान, या ठिकाणी काँग्रेस, जनविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत झाली. शिवसेनेही रिंगणात होती. या ठिकाणी धक्कादाय निकाल लागून आघाडीने सर्वाधिक आठ जागा जिंकल्या तर कॉंग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मागच्या निवडणुकीपेक्षा सरस कामगिरी केली. मात्र, त्यांच्या डॉक्टर कन्या डॉ. हर्षदा सोनवणे यांना पराभव पत्करावा लागला. डॉ. हर्षदा सोनवणे एमबीबीएसच्या अंतिम वर्षात पुण्याला शिकतात. या महिनाअखेर त्यांची परीक्षा आहे. ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांवरील आरक्षण रद्द झाल्याने स्थगित झालेल्या या चार जागांवरील निवडणुकीवेळी श्री. सोनवणे यांनी कन्येला निवडणुक रिंगणात उतरविले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT